मुंबई : आधार पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे. तुम्ही अजूनही आधारशी पॅन लिंक केलं नसेल तर 1000 रुपये दंड भरून करू शकता. जर ते लिंक नसेल तर 1 एप्रिलपासून पॅनकार्ड रद्द होणार आहे. त्यानंतर तुम्हाला पॅनकार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल आणि शिवाय 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. तुमचं आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही मुळात यासाठी आपल्याला हेच माहिती पाहिजे, ते कसं शोधायचं याची अगदी सोपी ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरबसल्या अगदी एका क्लिकवर तुम्ही हे शोधू शकता. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आयकर विभागाच्या incometax.gov.in वेबसाइटवर जायचं आहे. यानंतर तुम्ही ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन विंडो सुरू झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर एक मेसेज येईल. यावरून तुम्हाला कळेल की तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही.
‘ही’ कामं केली नसतील तर आत्ताच करा! अन्यथा होईल मोठे नुकसान, 31 मार्च आहे डेडलाईनआधार आणि पॅन लिंक कसे करावे incometax.gov.in या आयकर वेबसाइटवर जा यानंतर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. तिथे तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर आधी रजिस्टर करून लॉगइन करा.
त्यात तुमची जन्मतारीख पॅन क्रमांक आणि यूजर आयडी सोबत टाका. आधार कार्डावर छापल्याप्रमाणे जन्मतारीख टाका. यानंतर तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. येथे आधार कार्ड लिंक पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. तुम्हाला खाली आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात येईल.
पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेकं करायची? ही आहे सोपी प्रोसेसआधार कार्ड हे सर्व व्यवहारांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते. जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही. एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल. आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते. लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते. आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल.

)







