जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेकं करायची? ही आहे सोपी प्रोसेस

पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेकं करायची? ही आहे सोपी प्रोसेस

पॅन कार्ड व्हॅलिडिटी

पॅन कार्ड व्हॅलिडिटी

पॅनशी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. या तारखेनंतर तुम्ही आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकणार नाही. पॅनच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांची अनेक महत्त्वाची कामं अडकू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी: पॅन कार्ड सोबत आधार लिंक करण्यासाठी नागरिकांकडे 31 मार्च 2023 पर्यंत वेळ आहे. तुम्ही या तारखेपर्यंत पेनल्टी भरून आधार-पॅन लिंक करू शकता. अन्यथा पॅन आधारशी लिंक होणार नाही आणि तुमचा पॅन इनव्हॅलिड होईल. आयकरदाते अवैध पॅनमुळे आयटीआर भरू शकणार नाहीत. इतकंच नाही तर यामुळे तुमची पॅन कार्डशी संबंधित इतर कामेही थांबतील. उदाहरणार्थ, बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन आवश्यक आहे, परंतु पॅन कार्ड इनव्हॅलिड झाल्यावर हे करता येणार नाही. सध्या तुम्ही 1000 रुपयांमध्ये आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकता. तुमचा पॅन 31 तारखेनंतर व्हॅलिड आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही हे तुम्ही येथे तपासू शकता. हे कसं चेक करावंयासाठी काही स्टेप्स आपण जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला आयकर वेबसाइटवर हे काम सहज करता येईल. 31 तारखेनंतर पॅन कार्डची व्हॅलिडिटी कशी चेक करावी हे आधी जाणून घेऊया…

Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा ‘हे’ काम

व्हॅलिडिटी कशी चेक करावी? -सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in/home वर जा -यानंतर Verify Your PAN Details वर क्लिक करा. -आता तुमचा पॅन क्रमांक टाका. -यानंतर पॅन कार्डवर लिहिलेले पूर्ण नाव टाका. -पेजवर दिसणारा कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा. -यानंतर तुम्हाला वेबसाईटवर एक मेसेज दिसेल जो तुम्हाला कळेल की तुमचा पॅन सक्रिय आहे की नाही. -हे काम तुम्ही एसएमएसद्वारेही करू शकता. -यासाठी NSDL PAN सोबत तुमचा पॅन क्रमांक लिहून 567678 किंवा 56161 वर पाठवा.

नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे कसे ओळखायचे?

-सर्व प्रथम incometax.gov.in वर जा. -‘Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करा. -समोर उघडणाऱ्या नवीन विंडोमध्ये View Link Aadhaar Status वर क्लिक करा. -जर आधार-पॅन लिंक असेल तर तुम्हाला एक मॅसेज दिसेल. -जर आधार आणि पॅन लिंक नसेल तर तुम्ही ते इथेही लिंक करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

पॅन आधार कसं लिंक करावं?

तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटला भेट देऊन ’link Aadhar’ या सुविधेसह आधार आणि पॅन लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर, तेथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात