जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI ने सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्त्वाची सूचना, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर पूर्ण करा हे काम

SBI ने सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्त्वाची सूचना, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर पूर्ण करा हे काम

SBI ने सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्त्वाची सूचना, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर पूर्ण करा हे काम

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI State Bank of India) ग्राहकांना नोटीस जारी करत 30 सप्टेंबरपूर्वी पॅन कार्ड त्यांच्या आधार कार्डशी लिंक (PAN Aadhaar Link) करण्यास सांगितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI State Bank of India) ग्राहकांना नोटीस जारी करत 30 सप्टेंबरपूर्वी पॅन कार्ड त्यांच्या आधार कार्डशी लिंक (PAN Aadhaar Link) करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि डेडलाइन पूर्वी जर हे काम पूर्ण केले नाही तर बँक सर्व्हिसेस (Banking Services) वापरताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणं (PAN-Aadhaar linking) अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 सप्टेंबर आहे. अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील पॅन आणि आधार लवकरात लवकर लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. कशाप्रकारे करता येईल लिंकिंग प्रक्रिया? » तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. » हे जाणून घेण्याकरता इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा » त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. » आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. » अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.

जाहिरात

हे वाचा- Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांत मिळेल इंधन? SMS च्या माध्यमातून करा पॅन-आधार लिंक SMS च्या माध्यमातून पॅन-आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक<स्पेस>10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकांवर पाठवावा लागेल. हे वाचा- तुमच्याकडे आहे फाटक्या किंवा खराब नोटा? जाणून घ्या बदलून घेण्याची प्रक्रिया निष्क्रिय पॅन कसे कराल चालू? दरम्यान तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तरी ते पुन्हा चालू करता येऊ शकते. याकरता तुम्हाला एक एसएमएस करावा लागेल. याकरता मेसेजमध्ये आधार कार्ड क्रमांक लिहून त्यानंतर स्पेस द्या. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा. हा टाइप केलेला मेसेज तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात