मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्याकडे आहे फाटक्या किंवा खराब नोटा? जाणून घ्या बदलून घेण्याची प्रक्रिया

तुमच्याकडे आहे फाटक्या किंवा खराब नोटा? जाणून घ्या बदलून घेण्याची प्रक्रिया

अनेकदा आपल्याकडे कशा नोटा आहेत याकडे लोकांचं फारसं लक्ष नसतं. त्या नोटा फाटक्या किंवा खराब झालेल्या असतील तर कोणीही स्वीकारत नाही

अनेकदा आपल्याकडे कशा नोटा आहेत याकडे लोकांचं फारसं लक्ष नसतं. त्या नोटा फाटक्या किंवा खराब झालेल्या असतील तर कोणीही स्वीकारत नाही

अनेकदा आपल्याकडे कशा नोटा आहेत याकडे लोकांचं फारसं लक्ष नसतं. त्या नोटा फाटक्या किंवा खराब झालेल्या असतील तर कोणीही स्वीकारत नाही

मुंबई, 11 सप्टेंबर : सर्वच क्षेत्रावर कोरोनामुळे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनामुळे (Corona) प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्यानं अनेक व्यक्ती ऑनलाइन (Online) व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. लॉकडाउन किंवा निर्बंध शिथिल होताच काही प्रमाणात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार केले जात आहेत. एटीएमचा (atm) वापरदेखील पुन्हा सुरळीत होत आहे. अशातच एक नवी समस्या एसबीआयच्या (SBI) ग्राहकांना सतावत असल्याचं समोर आलं आहे. एटीएममधून मिळणाऱ्या नोटा फाटक्या किंवा खराब (Soiled Notes) असल्याची तक्रार ग्राहकांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ट्विटर हॅंडलवर केली आहे. यावर बॅंकेनं उत्तर दिलं आहे.

अनेकदा आपल्याकडे कशा नोटा आहेत याकडे लोकांचं फारसं लक्ष नसतं. त्या नोटा फाटक्या किंवा खराब झालेल्या असतील तर कोणीही स्वीकारत नाही. परंतु, अशा नोटा बॅंकांच्या शाखांमधून किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून बदलून दिल्या जातात. याबाबतचं परिपत्रक वारंवार आरबीआयकडून (RBI) जारी केलं जातं, याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिले आहे.

'ती' आली आणि तिने नदीत उडी मारली, लगेच 4 तरुणांनीही टाकल्या उड्या, आणि...

खराब झालेल्या किंवा फाटक्या नोटा बदलण्याचं मूल्य त्या नोटांच्या स्थितीवर अवलंबून असतं. 50 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटेचा सर्वांत मोठा तुकडा नॉर्मल नोटेच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अशी नोट बदलून घेतल्यास तिचं पूर्ण मूल्य मिळेल. 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या नोटेचा सर्वांत मोठा तुकडा सामान्य नोटेच्या तुलनेत 80 टक्के किंवा जास्त मोठा असेल तर या नोटेच्या बदल्यात तुम्हाला संपूर्ण मूल्य मिळेल. 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटेचा सर्वांत मोठा तुकडा सामान्य नोटेच्या 40 ते 80 टक्क्यांदरम्यान असेल तर तुम्हाला त्या नोटेची अर्धी रक्कम मिळेल. 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या एकाच नोटेचे दोन तुकडे असतील आणि हे तुकडे सामान्य नोटेच्या तुलनेत 40 टक्के आकाराचे असतील तर तुम्हाला नोटेच्या पूर्ण मूल्याइतकीच रक्कम मिळेल. 1, 2,5,10 किंवा 20 रुपयांची नोट बदलून घेतल्यास अर्धी रक्कम दिली जात नाही.

उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप, डोंगरांवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे हायवे ठप्प

50 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटेचा सर्वांत मोठा तुकडा सामान्य नोटेच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा कमी आकाराचा असेल तर ही नोट दिल्यावर कोणतीही रक्कम मिळणार नाही. 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटेचा सर्वांत मोठा तुकडा सामान्य नोटेच्या तुलनेत 40 टक्क्यांपेक्षा कमी आकाराचा असेल तर ही नोट दिल्यावर कोणतीही रक्कम दिली जात नाही.

खराब किंवा फाटक्या नोटा बदलून देण्याबाबत आरबीआयने काही नियम (Rules) आखून दिले आहेत. त्यानुसार एक व्यक्ती एका वेळी कमाल 20 नोटाच बदलून घेऊ शकते. परंतु, या नोटांचं एकूण कमाल मूल्य 5000 रुपयांपेक्षा जास्त नसावं. आरबीआयने निश्चित केलेल्या ठिकाणी अशा नोटा बदलून घेण्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. बॅंकेत एका रिसीटवर 20 पेक्षा अधिक नोटा स्वीकारल्या जाऊ शकतात. यापेक्षा अधिक नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने जे शुल्क निश्चित केलं आहे, त्यानुसार अदा करावं लागतं.

फाटक्या, खराब नोटा स्वीकारल्या जातात. परंतु, नोटांच्या सर्व तुकड्यांवर आवश्यक फीचर्स (Features)असणं गरजेचं असतं. एखादी नोट बहुतांश जळालेली असेल तर ती बदलून दिली जात नाही. अशा नोटा बदलण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया असते. त्यामुळे अशा नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये (Issue Office) जमा करण्याचा सल्ला दिला जातो. खराब, फाटक्या नोटा बदलून द्यायच्या की नाही याबाबतचा निर्णय संबंधित बॅंकेवर अवलंबून असतो. नोटा बदलून घेतेवेळी त्या जाणूनबुजून फाडलेल्या किंवा खराब केलेल्या नाहीत ना याचीही चौकशी बॅंकेकडून केली जाते.

एसबीआयच्या ग्राहकाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एसबीआयने म्हटलं आहे, की नोटांची गुणवत्ता अत्याधुनिक सॉर्टिंग मशीनच्या माध्यमातून तपासली जाते. त्यामुळे फाटक्या किंवा खराब नोटा मिळण्याची शक्यता कमी आहे. तरीही अशी नोट मिळालेली असेल, तर ग्राहक ती बँकेच्या कोणत्याही शाखेतून बदलून घेऊ शकतात.

First published:

Tags: Corona, Online, SBI