Home /News /money /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांत मिळेल इंधन?

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांत मिळेल इंधन?

पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol diesel latest rates) जारी करण्यात आले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 11 सप्टेंबर रोजी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: पेट्रोल-डिझेलचे नवे दर  (Petrol diesel latest rates) जारी करण्यात आले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 11 सप्टेंबर रोजी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. या संपूर्ण आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी रविवारी देशातील विविध शहरात पेट्रोल-डिझेलचे दर 10 ते 15 पैशांनी कमी झाले होते. त्यामुळे आजही रविवारचेच दर लागू होत आहेत. दररोज सकाळी सहा वाजता तेल मार्केटिंग कंपन्या इंधनाचे दर जारी करतात. सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता. SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. हे वाचा-दिलासा : बेरोजगारांना मिळत राहणार भत्‍ता, जून 2022 पर्यंत वाढवली योजना तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 11th Sept 2021) >> दिल्ली पेट्रोल  101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर हे वाचा-केंद्र सरकारच्या या योजनेत दीड लाख वार्षिक गुंतवून मिळवा 1 कोटी, काय आहे स्कीम? >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut

    पुढील बातम्या