Home /News /money /

EPFO Update: कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे ही महत्त्वाची योजना

EPFO Update: कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे ही महत्त्वाची योजना

तुमच्या कंपनीकडून पीएफमध्ये जमा होणाऱ्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये (EPS) देखील जमा होतो. EPS च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. ईपीएसची योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील फायद्याची ठरेल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 जुलै: तुम्ही ईपीएफओ सदस्य (EPFO) असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कामगार मंत्रालयाच्या (Labour Ministry) ईपीएफओकडून विविध कंपन्या आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेन्शन देण्याची योजना राबवली जाते. पीएफमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला ठराविक योगदान जमा (PF Contribution) केले जाते, तेवढाच हिस्सा कंपनीकडूनही दिला जातो. कंपनीकडून पीएफमध्ये जमा होणाऱ्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये (EPS) देखील जमा होतो. EPS च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. ईपीएसची योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील फायद्याची ठरेल. ईपीएस मेंबरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अर्थात पती किंवा पत्नीला आणि मुलांना पेन्शनचा फायदा मिळतो. यामुळे या योजनेला फॅमिली पेन्शन (Family Pension) देखील म्हटलं जातं. केव्हा मिळते पेन्शन? अशाप्रकारे निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला 10 वर्षापर्यंत एकाच ठिकाणी नोकरी करणं आवश्यक आहे. तेव्हाच या पेन्शनला फॅमिली पेन्शन मानलं जातं. या पेन्शन योजनेत केवळ कंपनीचं योगदान जमा केलं जातं. पीएफमध्ये कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या 12 टक्के योगदानापैकी हे 8.33 टक्के योगदान असतं.  पेन्शनमध्ये सरकारचंही योगदान असतं, जे मूलभूत वेतनाच्या 1.16 टक्क्यांपेक्षा जास्त नसतं. ईपीएफ सदस्याला निवृत्ती व्यतिरिक्त, जर अपंगत्व आल्यास देखील पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. हे वाचा-Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा 47 हजारांपार! चांदीची झळाळी उतरली कुणाला मिळते पेन्शन? -ईपीएस स्कीममधील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी किंव पतीला पेन्शन मिळतं -कर्मचाऱ्याला जर मुलं असतील तर 2 मुलांना वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत पेन्शन मिळते. हे वाचा-कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, तुमच्या पत्नीलाही मिळेल अतिरिक्त लाभ? -कर्मचाऱ्याचं लग्न झालेलं नसेल तर त्याने दिलेल्या नॉमिनीला पेन्शन मिळेल -जर कुणी नॉमिनी नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे आई-वडिलांना पेन्शन मिळण्याचा हक्क आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Epfo news, Money, Pension, Pension funds, Pension scheme, Pf, PF Amount, PF Withdrawal

    पुढील बातम्या