• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा 47 हजारांपार! चांदीची झळाळी उतरली

Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा 47 हजारांपार! चांदीची झळाळी उतरली

Gold Silver Price, 20 July 2021: सोन्याच्या किंमतीत मंगळवारी तेजी पाहायला मिळाली आहे. तर आज चांदीचे भाव उतरले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जुलै: भारतीय सराफा बाजारात आज 20 जुलै रोजी सोन्याचे भाव (Gold Price Today) वधारले आहेत. यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा 47,000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त झाले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) आज उतरले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates) 46,847 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर (Silver Rates)  65,791 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत तर चांदीच्या दरात कोणता विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Price Today on 20th July 2021) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 253 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर प्रति तोळा सोन्याचे दर 47 हजारांपेक्षा जास्त स्तरावर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 47,100 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Rates in International Market) 1,813 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. याठिकाणीही आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. हे वाचा-कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, तुमच्या पत्नीलाही मिळेल अतिरिक्त लाभ? चांदीचे नवे दर (Silver Price Today on 20th July 2021) सोन्याचे दर वाढले असले तरी चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज मंगळवारी चांदीचे दर 61 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर चांदीचे दर 65,730 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आज विशेष बदल झालेला नाही. याठिकाणी दर 25.06 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा-खूशखबर! या दिवशी तुमच्या PF खात्यात येईल 8.5 टक्के व्याज, असा तपासा तुमचा बॅलन्स का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे सोन्यामध्ये तेजी आली आहे. सोमवारी सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आज होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: