मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Good News! कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, तुमच्या पत्नीलाही मिळेल अतिरिक्त लाभ?

Good News! कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, तुमच्या पत्नीलाही मिळेल अतिरिक्त लाभ?

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM kisan samman nidhi scheme) नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात पाठवला जाणार आहे. जाणून घ्या जर पती-पत्नी दोघांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे तर त्यांना एकूण 12000 रुपयांचा फायदा मिळणार का?

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 20 जुलै: तुम्ही देखील पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये पाठवला जाईल. केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. एकूण तीन हप्ते अर्थात 6000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळतो. आतापर्यंत या योजनेचे आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे.

दरम्यान असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की जर पती आणि पत्नी दोघांनी या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर दोघांना मिळून 12000 हजारांचा लाभ मिळणार का? जाणून घ्या काय आहे नियम

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाना लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. या स्कीमअंतर्गत सरकारने स्पष्ट लिहिलं आहे की कुटुंबाचा अर्थ पती-पत्नी आणि दोन मुलं असा होतो, अर्थात कुटुंबातील एकाच सदस्याला या स्कीमचा फायदा मिळतो.

हे वाचा-नोकरदारांसाठी खूशखबर! 1ऑक्टोबरपासून बेसिक सॅलरी 15000 वरुन 21000 होण्याची शक्यता

सरकार वसूल करणार ही रक्कम

जर कुटुंबात पती आणि पत्नी दोघांना या स्कीमचा फायदा मिळत असेल, तर त्यांना मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल केली जाऊ शकते. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये पती आणि पत्नी दोघांनी पीएम शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे. अशांकडून सरकार रक्कम वसूल करणार आहे.

केव्हा मिळतात या योजनेतील पैसे?

ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो.

हे वाचा-खूशखबर! या दिवशी तुमच्या PF खात्यात येईल 8.5 टक्के व्याज, असा तपासा तुमचा बॅलन्स

आतापर्यंत किती हप्ते झालेत जारी?

पहिला हप्ता- फेब्रुवारी 2019 मध्ये

दुसरा हप्ता- 2 एप्रिल 2019 मध्ये

तिसरा हप्ता- ऑगस्ट 2019

चौथा हप्ता- जानेवारी 2020 मध्ये

पाचवा हप्ता- 1 एप्रिल 2020 मध्ये

सहावा हप्ता- 1 ऑगस्ट 2020 मध्ये

सातवा हप्ता- डिसेंबर 2020 मध्ये

आठवा हप्ता- एप्रिल 2021 मध्ये

First published:

Tags: Money, PM Kisan, PM narendra modi