मुंबई, 16 जानेवारी: तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे की नाही? नसेल तर हे काम लगेच करा. कारण पॅन-आधार लिंकिंगची शेवटची तारीख जवळ येत आहे. पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून इन्कम टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन करू शकता. त्यामुळे आयकर रिटर्नच्या जलद आणि सुलभ ई-व्हेरिफिकेशनसाठी पॅन-आधार लिंक करा.
मोबाईल नंबर बदलला आहे का? आधार कार्डला असा करा लिंकआयकर विभागाने पर्मानेंट अकाउंट नंबर होल्डर्सना त्यांचा नंबर आधार कार्डशी लिंक करण्याचा शेवटचा इशारा दिला आहे. लेटेस्ट पब्लिक अॅडव्हाजरीनुसार, 31 मार्च 2023 पूर्वी पॅन आधारशी लिंक न केल्यास, पॅन निष्क्रिय होईल. अंतिम मुदत संपल्यानंतर, पॅन कार्ड धारक त्यांचा 10 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक नंबर वापरू शकणार नाहीत आणि पॅनशी जोडलेले आर्थिक व्यवहार थांबवले जातील. तसेच, सर्व इनकम टॅक्स पेडिंग रिटर्नची प्रोसेसिंग थांबवली जाईल.
डिसेंबरमध्ये महागाईपासून मिळाला दिलासा! घाऊक महागाई दर 22 महिन्यांच्या निचांकावरपॅनला आधार लिंक करण्याच्या सोप्या स्टेप्स
- पॅनला आधारसोबत लिंक करण्यासाठी सर्वात पहिले इनकम टॅक्सची वेबसाइट www.incometax.gov.in वर जावे. वेबसाइट ओपन केल्यानंतर क्विक लिंक्सच्या ऑप्शनवर जाऊन लिंक आधारच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता आपला पॅन आणि आधार नंबर टाका आणि नंतर व्हॅलिडेटवर क्लिक करा.
- जर तुमचा आधार आणि पॅन पहिलेच लिंक असेल तर तुमच्या स्क्रिनवर पॅन पूर्वीच आधारशी लिंक असल्याचा मॅसेज येईल.
- जर तुमचा पॅन तुमच्या आधारशी लिंक नसेल आणि तुम्ही NSDL पोर्टलवर चलन भरले असेल, तर पेमेंट माहिती इलेक्ट्रॉनिक फाइलिंगद्वारे प्रमाणित केली जाईल. पॅन आणि आधारची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला एक पॉप-अप सूचना मिळेल ज्यामध्ये तुम्हाला सांगितले जाईल की, तुमचे पेमेंट डिटेल्स व्हेरिफाइड झाले आहेत.
- सर्व तपशील भरल्यानंतर लिंक आधार पर्यायावर क्लिक करा आणि नंतर तुमच्या मोबाइल फोन नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी ओटीपी येथे टाकावा.
- आधार-पॅन लिंकसाठी तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, तुम्ही आता त्याची स्थिती तपासू शकता तपासू शकता.