दिल्ली 16 जानेवारी देशातील जनतेला आता महागाईपासून दिलासा मिळताना दिसत आहे. याचा पुरावाही आजच्या घाऊक महागाई दराच्या आकडेवारीच्या रूपाने समोर आला आहे. भारतातील घाऊक महागाई डिसेंबर 2022 मध्ये 4.95 टक्क्यांवर आली आहे. खाद्य पदार्थ आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे घाऊक महागाई 22 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली आहे. सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.
‘या’ वस्तूंच्या किंमती घटल्याने महागाई कमी
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘खाद्यपदार्थ, खनिज तेल, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, फूड प्रोडक्ट्स, टेक्सटाइल, रसायन आणि रासायनिक उत्पादनांच्या किमती घसरल्यामुळे प्रामुख्याने डिसेंबर 2022 मध्ये महागाईत घट झाल्याचे पाहायला मिळाले.
होम लोनची परतफेड करताना कोणता पर्याय ठरेल फायद्याचा? जाणून घ्या22 महिन्यांतील निच्चांक पातळी
फेब्रुवारी 2021 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाईचा दर पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा दर 4.83 टक्के होता. होलसेल प्राइस इंडेक्सवर आधारित महागाई दर नोव्हेंबर 2022 मध्ये 5.85 टक्के होता. तर डिसेंबर 2021 मध्ये 14.27 टक्के होता. आता हा महागाई दर डिसेंबरमध्ये 4.95 टक्क्यांवर आला आहे.
होम लोनची परतफेड करताना कोणता पर्याय ठरेल फायद्याचा? जाणून घ्याकिरकोळ महागाईतही झाली होती घट
यापूर्वी 12 जानेवारीला किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईत सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये CPI महागाई 5.72 टक्के होती. सलग तिसऱ्या महिन्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईतील हा दिलासा मुख्यत्वे अन्नपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2022 मध्ये 5.88 टक्के आणि गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये 5.66 टक्के होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिसेंबर 2022 मध्ये लोकसभेत आश्वासन दिले होते की, केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करेल.

)







