जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मोबाईल नंबर बदलला आहे का? आधार कार्डला असा करा लिंक

मोबाईल नंबर बदलला आहे का? आधार कार्डला असा करा लिंक

मोबाईल नंबर बदलला आहे का? आधार कार्डला असा करा लिंक

जर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलला असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. दुसरा क्रमांक कसा लिंक करायचा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 16 जानेवारी : आजच्या काळात आधार कार्ड हे अनेक सुविधांसाठी आवश्यक झाले आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे आधार असणे आवश्यक आहे. तसेच, आधार तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेला असावा. कारण, तुम्ही आधारशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार केल्यास, त्याच्या पडताळणीसाठी ओटीपी येईल. हे फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर येते. म्हणूनच तुमचा मोबाईल नंबर UIDAI च्या वेबसाइटवर रजिस्टर असावा.

तुम्हीही बँक लॉकरचा वापर करता का? जाणून घ्या नवे नियम

जर तुम्हाला mAadhaar अॅप वापरायचे असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, तर आधारची व्हॅलिडेशन करण्यासाठी येणारा OTP येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करू शकता. तुम्ही तुमचा नवीन मोबाईल नंबर आधारमध्ये सोप्या पद्धतीने कसा अपडेट करावा याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

आता कार घेणे महागले! देशातील सर्वात मोठ्या कंपनीने वाढवल्या वाहनांच्या किंमती

या स्टेप्स फॉलो करुन रजिस्टर करा नवा मोबाईल नंबर

  • तुमच्या क्षेत्रातील आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
  • तुम्हाला फोन नंबर लिंक करण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल. याला आधार करेक्शन फॉर्म म्हणतात. यामध्ये योग्य माहिती भरा.
  • भरलेला फॉर्म 25 रुपये फिससह तेथील अधिकाऱ्याकडे जमा करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक स्लिप दिली जाईल.
  • या स्लिपमध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल. या रिक्वेस्ट नंबरद्वारे तुम्ही नवीन फोन नंबर तुमच्या आधारशी लिंक आहे की नाही हे तपासू शकता.
  • तीन महिन्यांत तुमचा आधार नवीन मोबाईल क्रमांकाशी लिंक केला जाईल.
  • तुमचा आधार नवीन मोबाईल नंबरशी लिंक झाल्यावर तुमच्या त्याच नंबरवर OTP येईल.
  • तो OTP वापरून तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
  • UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तुम्ही नवीन मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे स्टेटस  देखील जाणून घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात