• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमचं Aadhaar-Pan कार्ड लिंक आहे का? नसेल तर मिनिटांत असं करा लिंक

तुमचं Aadhaar-Pan कार्ड लिंक आहे का? नसेल तर मिनिटांत असं करा लिंक

Aadhaar कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : Aadhaar कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सीबीडीटी (Central Board of Direct Taxes) ने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. CBDT ने 17 सप्टेंबर रोजी ट्विट करुन आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2022 पर्यंत वाढली असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 होती. Central Board of Direct Taxes ने सांगितलं, की कोरोनामुळे परिस्थिती कठीण असताना विविध स्टेकहोल्डर्सनी केलेल्या आवाहानानंतर पॅन आधारशी जोडण्याची डेडलाइन वाढवली आहे. ...अन्यथा पॅन कार्ड निष्क्रिय होणार आयकर कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई पूर्ण करण्याची शेवटची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आधी ही शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 होती. आता ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास, पॅन कार्ड निष्क्रिय घोषित केलं जाईल. बँक अकाउंट ओपन करणं, बँकेचे व्यवहार, म्युचुअल फंड ट्रान्झेक्शन, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंटसारख्या कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. परंतु 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास 50000 किंवा त्याहून अधिक बँकेच्या व्यवहारावर 10000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. तसंच बँकेकडून डबल TDS ही कापला जाऊ शकतो. त्यामुळे पॅन नंबर, आधार नंबरशी लिंक करणं गरजेचं आहे. यासाठीही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

  नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर करायचे आहेत PF चे पैसे? जाणून घ्या सोपी पद्धत

  पॅन-आधार कसं लिंक कराल? - सर्वात आधी इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जावं लागेल. - त्यानंतर होम पेजवर डाव्या बाजूला Link Aadhaar पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. - आता समोर डिटेल्स भरण्यासाठी ऑप्शन दिसेल, इथे सर्व डिटेल्स भरा. - आता कॅप्चा कोड टाका. - Link Aadhaar वर क्लिक करा. - या प्रोसेसनंतर पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक होईल. याची माहिती स्क्रिनवर दिसेल.

  Aadhaar च्या चुकीच्या वापराबाबत आता नो टेन्शन; गरजेनुसार असं करा लॉक-अनलॉक

  ऑफलाईन प्रोसेस - यासाठी SMS करावा लागेल. SMS द्वारे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी रजिस्टर्ड नंबरवरुन UIDPAN <Aadhar Number> <Pan Number> टाइप करुन 567678 किंवा 561561 वर SMS करावा लागेल. त्यानंतर पॅन कार्ड आधारशी लिंक झाल्याचा मेसेज येईल.
  Published by:Karishma
  First published: