मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर करायचे आहेत PF चे पैसे? जाणून घ्या सोपी पद्धत

नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर करायचे आहेत PF चे पैसे? जाणून घ्या सोपी पद्धत

How to transfer pf amount online: तुम्ही देखील अलीकडेच नोकरी बदलली आहे का? नोकरी बदलल्यानंतर पीएफ नवीन प्रोव्हिडेंट फंडमध्ये ट्रान्सफर करता येईल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: तुम्ही देखील अलीकडेच नोकरी बदलली आहे का? नोकरी बदलल्यानंतर पीएफ नवीन प्रोव्हिडेंट फंडमध्ये ट्रान्सफर करता येईल. तुम्ही देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (Employee Provident Fund Organization) सदस्य असाल तर तुम्ही ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर (how to transfer pf amount online) करू शकता. नोकरी बदलताना, तुम्हाला तुमच्या जुन्या EPF खात्यातून नवीन कंपनीच्या EPF खात्यात पैसे ट्रान्सफर करावे लागतील जेणेकरून तुम्हाला PF च्या एकूण रकमेवर अधिक व्याज मिळेल. तुमचा पीएफ कसा हस्तांतरित (How to transfer PF) करायचा हे जाणून घ्या.

घरबसल्या ट्रान्सफर करा पीएफचे पैसे

>> सर्वात आधी EPFO च्या वेबसाइटवर UAN नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करा

>> EPFO च्या साइटवर ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये जाऊन एक सदस्य एक ईपीएफ खाते या पर्यायाची निवड करा

>> याठिकाणी पुन्हा एकदा UAN नंबर प्रविष्ट करा. जुना ईपीएफ मेंबर आयडी प्रविष्ट केल्यानंतर खात्याची संपूर्ण माहिती मिळेल

हे वाचा-मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार KCC, अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा फायदा

>> याठिकाणी हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी आपली जुनी किंवा नवीन कंपनी निवडा

>> तुमचे जुने खाते निवडा आणि ओटीपी जनरेट करा

>> ओटीपीच्या प्रविष्ट केल्यानंतर पैसे हस्तांतरणाचा पर्याय सुरू होईल.

>>ट्रॅक क्लेम स्टेटस मेनूमधून तुम्ही ऑनलाइन स्थिती पाहू शकाल.

हे वाचा-खूशखबर! होम आणि कार लोनवरील EMI होणार कमी, SBI-PNB नंतर या बँकेने घटवले व्याजदर

नवीन कंपनीत जमा करावे लागतील दस्तावेज

ऑनलाईन अर्ज सबमिट केल्याच्या 10 दिवसांच्या आत निवडलेल्या कंपनीला किंवा संस्थेला पीडीएफ फाइलमध्ये ऑनलाईन पीएफ ट्रान्सफर अर्जाची सेल्फ अटेस्टेड कॉपी सबमिट करा. त्यानंतर कंपनी त्याला मान्यता देईल. मान्यता मिळाल्यानंतर, पीएफ सध्याच्या कंपनीकडे असलेल्या नवीन पीएफ खात्यात हस्तांतरित केला जातो.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news