जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेक

तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेक

पॅन आधार लिंक

पॅन आधार लिंक

तुम्ही पॅन-आधार कार्ड लिंक केले होते की नाही हे तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्ही ते चेक करु शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीही पद्धतींनी स्टेटस चेक करु शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 मार्च: पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक केलेले नसेल, तर तुम्हाला ते लगेच लिंक करावे लागेल कारण त्याची डेडलाइन 31 मार्च 2023 पर्यंत आहे. 31 मार्च 2023 पर्यंत प्रत्येकाने आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करावे लागेल. असे न झाल्यास, पॅन कार्ड अवैध किंवा निष्क्रिय केले जाईल. त्यानंतर कोणत्याही आर्थिक व्यवहारात त्याचा वापर करता येणार नाही. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षी सरकारने मुदत वाढवून देण्यास नकार दिला. मात्र, त्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली होती. जून 2022 नंतर, 1000 रुपये दंड भरून ते लिंक केले जाऊ शकते. सध्या 31 मार्च 2023 ही वेळ आहे आणि यावेळी जर कोणी आधारशी पॅन लिंक करू शकला नाही तर 1 एप्रिल 2023 पासून तो अवैध घोषित केला जाईल.

Aadhaar-Pan Link बाबात मोठी अपडेट! या लोकांना मिळणार सूट, पाहा काय कारण

तुम्ही पॅन-आधार कार्ड लिंक आहे की नाही हे असं करा चेक

जर तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही पॅन-आधार कार्ड लिंक केले आहे की नाही, आणि तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल की नाही याची काळजी वाटत असेल, तर तुम्ही ते तपासू शकता. याची ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टेप आपण जाणून घेणार आहोत.

Aadhaar Card हरवलंय? चुकीचा वापर होऊ नये म्हणून असं करा लॉक

SMS च्या माध्यमातूनही तुम्ही पॅन-आधार लिंक स्टेटस चेक करु शकता. यासाठी ‘UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number>’ या फॉर्मेटमध्ये 567678 किंवा 56161 नंबरवर मॅसेज पाठावा. तुमचं आधार-पॅन लिंक असेल तर स्क्रीनवर हा मॅसेज दिसेल. “Aadhaar…is already associated with PAN (number) in ITD database. Thank you for using our services.” जर तुमचं पॅन-आधार लिंक नसेल तर “Aadhaar…is not associated with PAN (number) in ITD database.” हा मॅसेज दिसेल.

News18लोकमत
News18लोकमत

ऑनलाइन वेब पोर्टलवरुन स्टेटस कसं चेक करावं?

-UIDAI की वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावं. -“Aadhaar Services” मेन्यूवरुन “Aadhaar Linking Status” सिलेक्ट करा. -आता आपला 12 डिजिटचा आधार नंबर टाकून “Get Status” बटनवर क्लिक करा. -येते तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल, यासोबतच कॅप्चा कोडही टाकावा लागेल. -आपल्या पॅन-आधार लिंकिंग स्टेटस चेक करण्यासाठी “Get Linking Status” वर क्लिक करा. -यानंतर तुम्हाला स्क्रिनवर दिसेल की, तुमचा आधार पॅनशी लिंग झाला आहे की नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात