आधार कार्ड हरवलं असेल तर तुम्ही एसएमएसद्वारे घरी बसून तुमचे आधार कार्ड लॉक करू शकता. यामुळे तुमचा सर्व डेटा सुरक्षित राहील आणि ऑनलाइन फसवणूक होणार नाही. सावधान! डेबिट कार्ड वापरताना तुम्ही करताय 'ही' चूक, होईल मोठे नुकसान
एसएमएस सेवेद्वारे आधार क्रमांक लॉक कसा करायचा? : तुमचा आधार देखील कुठेतरी हरवला असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की ऑनलाइन फसवणूक होऊ शकते. तर घरी बसून तुम्ही एसएमएस सेवेद्वारे तुमचा आधार क्रमांक सहजपणे लॉक करू शकता. चला जाणून घेऊया कसे... नवीन आधार कार्ड तयार करायचंय? असं करता येईल अप्लाय
मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा. यानंतर तुम्हाला 6 अंक ओटीपी मिळेल. नंतर लॉकिंग रिक्वेस्टसाठी > LOCKUID लास्ट 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा पाठवा. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल. जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक एकदा लॉक केला असेल, तर त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करून कोणतेही व्हेरिफिकेशन करू शकत नाही.
SMS द्वारे आधार कार्ड अनलॉक कसे करावे : मेसेजमध्ये GETOTP आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा आणि 1947 वर पाठवा. मग तुम्हाला एक ओटीपी येईल. त्यानंतर अनलॉकिंग रिक्वेस्टसाठी 4 किंवा 8 अंकी आधार क्रमांक आणि OTP पुन्हा या नंबरवर पाठवा. यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असं करा UPI पेमेंट, या स्टेप करा फॉलो