• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • स्वस्तात खरेदी करा स्वस्त:चं घर! 10 वर्षात निचांकी आहे व्याजदर, तपासा अन्य सवलतींसह बँकांचे Interest Rate

स्वस्तात खरेदी करा स्वस्त:चं घर! 10 वर्षात निचांकी आहे व्याजदर, तपासा अन्य सवलतींसह बँकांचे Interest Rate

गेल्या अनेक वर्षांपासून घर घेण्यासाठीच्या संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फेस्टिव्ह सीझनआधी तुम्हाला विविध बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपनी विविध सवलती देत आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: गेल्या अनेक वर्षांपासून घर घेण्यासाठीच्या संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फेस्टिव्ह सीझनआधी तुम्हाला विविध बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपनी विविध सवलती देत आहेत. याशिवाय होम बिल्डर्स (Home builders Offering Great Deal) देखील ग्राहकांना विविध सवलती उपलब्ध करून देत आहेत. या सर्वांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार घर खरेदी करू शकता. वाढती मागणी लक्षात घेता बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर (Home loan interest rate) कमी केला आहे. सध्या विविध बँकांमध्ये गृहकर्जावर मिळणारा व्याजदर गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळीवर आहे. अशावेळी घरखरेदी करणं अनेकांसाठी स्वस्त होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, एलआयसी हाउसिंग फायनान्स यासह अनेक संस्थांनी होम लोनवरील व्याजदर 15-60 बेसिस पॉइंट्सनी कमी करून 6.5% च्या आसपास आहेत. 6.7% व्याज गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी आहेत. प्रॉपर्टी बिल्डर्स देखील देत आहेत जबरदस्त सूट केवळ बँका नाहीत ग्राहकांना प्रॉपर्टी डीलर्स देखील शानदार ऑफर्स देत आहेत. बिल्डर्स घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सूट आणि भेटवस्तू देत आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याने बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देत आहेत. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट मोठ्या अब्ज विक्रीचा भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक्सवर 80% सूट देत आहे. Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर प्रॉपर्टी रिसर्च फर्म जोन्स लँगचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधन प्रमुख सामंतक दास यांच्या मते, गृह कर्जाचे व्याजदर कमी करण्याच्या निर्णयामुळे घरांच्या स्थिर किमती आणि सणासुदीच्या काळात निवासी विक्रीला चालना मिळेल. LIC Housing Finance देतंय शानदार ऑफर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी लाइफ इन्शोरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी (LIC Housing Finance) तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी देत आहे. कंपनी ग्राहकांना सर्वात कमी व्याज दराने अर्थात 6.66 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. कोणताही ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतो. जुलै 2021 मध्ये कंपनीने घोषणा केली होती की नवीन ग्राहक 6.66 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतात. कंपनीने आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवली आहे. या स्कीमचा लाभ ग्राहकाना 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान घेता येणार आहे. Petrol-Diesel Price Today: डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, मुंबईत भाव 107 रुपयांवर HDFC ने घटवले व्याजदर हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Housing Development Finance Corporation Limited) अर्थात HDFC या देशातल्या दिग्गज गृहकर्ज पुरवठादार (Which is the best Home Loan Provider Company) कंपनीने सणासुदीच्या काळाच्या (Festive Season Special Offer) पार्श्वभूमीवर गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये कपातीची (Home Loans Interest Rated) घोषणा केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कमीत कमी 6.70 टक्के वार्षिक दरापासून गृहकर्ज मिळू शकणार आहे. या विशेष योजनेअंतर्गत कपात झालेले व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार या विशेष योजनेचा लाभ 31 ऑक्टोबर 2021पर्यंत, म्हणजेच दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापर्यंत घेता येणार आहे. Amazon फेस्टिव सीझनआधी देतंय लाखो लोकांना नोकरी; 1,10,000 जणांना मिळणार Jobs SBI ने कमी केला व्याजदर एसबीआयने फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत 31 मार्चपर्यंत गृहकर्जावरील दर 6.7 टक्के केले आहेत. तर कोटक महिंद्रा बँकेने 9 सप्टेंबर रोजी जाहीर केले की त्याने 10 सप्टेंबरपासून गृह कर्जाचे दर 15 बेसिस पॉइंटने कमी केले आहेत. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आता 6.65 टक्के वार्षिक ऐवजी 6.50 टक्के वार्षिक दराने गृहकर्ज देत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: