जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol-Diesel Price Today: डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, मुंबईत भाव 107 रुपयांवर

Petrol-Diesel Price Today: डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, मुंबईत भाव 107 रुपयांवर

Petrol-Diesel Price Today: डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, मुंबईत भाव 107 रुपयांवर

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel price today) दरात आज पुन्हा बदल करण्यात आली आहे. डिझेलचे दर (Diesel Price Today) आज 18 दिवस स्थिर राहिल्यानंतर पुन्हा एकदा वाढले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनवी दिल्ली, 24 सप्टेंबर: पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel price today) दरात आज पुन्हा बदल करण्यात आली आहे. डिझेलचे दर (Diesel Price Today) आज 18 दिवस स्थिर राहिल्यानंतर पुन्हा एकदा वाढले आहेत. तर पेट्रोलचे दर स्थिर आहेत.  पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या वाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये तर डिझेलचे दर 88.82 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. 6 वाजता बदलतात पेट्रोल-डिझेलचे दर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज सकाळी 6 वाजता बदल होतो. नवे दर सकाळी 6 पासून लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या किंमती काय आहेत या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. हे वाचा- IPL सामन्यादरम्यान Paytm वरून 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी, करावं लागेल हे काम चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर » दिल्ली पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.82 रुपये प्रति लीटर » मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.41 रुपये प्रति लीटर » चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.46 रुपये प्रति लीटर » कोलकाता पेट्रोल 101.62 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये प्रति लीटर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत (Petrol and diesel are not covered by GST) येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 45 व्या GST काउन्सिल बैठकीनंतर (Nirmala Sitharaman 45th GST Council meeting in Lucknow) वित्त मंत्री निर्मला सीमारामन यांनी यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, जीएसटी काउन्सिलने सांगितलं की, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही. हे वाचा- LIC देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! कमी व्याजदरात मिळेल 2 कोटीपर्यंतचे कर्ज अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात