जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर, किती कमी झाला सोन्याचांदीचा भाव?

Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर, किती कमी झाला सोन्याचांदीचा भाव?

Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर, किती कमी झाला सोन्याचांदीचा भाव?

सोन्याचांदीच्या दरात (Gold silver price) गेले काही दिवस चढउतार कायम आहे. गेल्या महिनाभरात अधिक घसरण झाल्याने जवळपास 1200 रुपयांनी दर कमी झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: सोन्याचांदीच्या दरात (Gold silver price) गेले काही दिवस चढउतार कायम आहे. गेल्या महिनाभरात अधिक घसरण झाल्याने जवळपास 1200 रुपयांनी दर कमी झाले आहेत. दरम्यान आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (gold Rates on MCX) वर सोन्याची वायदे किंमत आज 0.04 टक्क्यांनी वाढली आहे, तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत. काल सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. दुसरीकडे, जर चांदीबद्दल बोलायचे झाले तर गुरुवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली, जी अलिकडच्या महिन्यांतील सर्वाधिक आहे. एका महिन्यात किती स्वस्त झालं सोनं? जर गेल्या एका महिनाभराबाबत बोलायचं झालं तर, महिनाभरात सोन्याचे दर 1,111 रुपयांनी कमी झाले आहेत. 26 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर एमसीएक्सवर 47,188 रुपये प्रति तोळा होते तर चांदीचे दर 63,192 रुपये प्रति किलोग्रॅमवर होते. हे वाचा- Amazon फेस्टिव सीझनआधी देतंय लाखो लोकांना नोकरी; 1,10,000 जणांना मिळणार Jobs आज काय आहेत सोन्याचांदीचे दर एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर  46,075 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर  60,714 रुपये प्रति किलोवर आहेत. रेकॉर्ड स्तरापेक्षा 10,200 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 10,200 रुपयांनी कमी मिळत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर होते, सोन्याने यावेळी सर्वोच्च स्तर गाठला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर घसरल आहेत. हे वाचा- IPL सामन्यादरम्यान Paytm वरून 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी, करावं लागेल हे काम मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात