नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: कमी जोखीम घेणारे अधिकतर गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits)मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. फिक्स्ड डिपॉझिट (FD) गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. एफडीमध्ये सुरक्षित गुंतवणूक करता येते त्याचबरोबर याठिकाणी जोखीम देखील कमी आहे. यामध्ये मिळणारा रिटर्न देखील सुनिश्चित असतो. अधिकतर गुंतवणूकदार त्याच बँकांमध्ये एफडी करतात, जिथे त्यांचे बँक बचत खाते आहे. दरम्यान ज्या बँकांमध्ये तुमचे बचत खाते नाही आहे, अशाठिकाणी देखील एफडीची सुविधा काही बँका देतात.
कोणत्याही सुविधेमध्ये गुंतवणूक करताना, ज्या बँकेत तुम्ही गुंकवणूक करणार आहात त्याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. सध्या एफडीवरील व्याजदर घटवण्यात आले आहेत. परिणामी ग्राहक चांगल्या दराच्या एफडीच्या शोधात आहेत. अशा काही बँका आहेत ज्या एका वर्षाच्या एफडीवर 7 टक्केपर्यंत व्याज देतात. जाणून घेऊया या बँकांबद्दल-
खाजगी क्षेत्रातील बँका
1. इंडसइंड बँक - 7 टक्के व्याजदर
2. येस बँक - 7 टक्के व्याजदर
(हे वाचा-'या' शेतकऱ्यांकडून सरकार परत घेणार दिलेले 6000 रुपये, तुम्ही या यादीत आहात का?)
3. आरबीएल बँक - 6.85 टक्के व्याजदर
4. डीसीबी बँक - 6.50 टक्के व्याजदर
5. बंधन बँक - 5.74 टक्के व्याजदर
विदेशी बँका
1. स्टँडर्ड चार्डट बँक - 6.3 टक्के व्याजदर
2. डीबीएस बँक - 4.15 टक्के व्याजदर
(हे वाचा-निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासल्यास नो टेन्शन! या योजनेमध्ये करा गुंतवणूक)
3. Deutsche बँक - 4 टक्के व्याजदर
4. एचएसबीसी बँक - 3.25 टक्के व्याजदर
5. सिटी बँक - 3 टक्के व्याजदर
बँक बाजारच्या आकडेवारीनुसार छोट्या बँका एका वर्षासाठी करण्यात आलेल्या एफडीवर अधिक व्याज देतात. या बँकांमध्ये विदेशी बँकांपेक्षाही अधिक व्याजदर मिळतो. यामध्ये इंडसइंड बँक आणि येस बँक आघाडीवर आहे.
देशातील मोठ्या बँकांपैकी एक असणाऱ्या HDFC, ICICI, Axis बँकांमध्ये अनुक्रमे 5.15, 5.10 आणि 5 टक्के दराने एका वर्षाच्या एफडीवर व्याज मिळते. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआय आणि बँक ऑफ बडोदामध्ये एफडीवर एका वर्षासाठी 4.90 टक्के व्याज मिळते.
(हे वाचा-दसरा दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! सरकार विनाव्याज देणार 10000)
5 लाख रुपयांपर्यंतच्या एफडीमध्ये गुंतवणुकीची गॅरंटी आरबीआयची सहाय्यक कंपनी डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे दिली जाते. खाजगी बँकांमध्ये कमीतकमी 100 ते 10 हजाराची गुंतवणूक करावी लागते. तर विदेशी बँकांमध्ये ही रक्कम 1000 ते 20000 रुपये प्रति वर्ष आहे.