मराठी बातम्या /बातम्या /मनी /Big Alert! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार परत घेणार दिलेले 6000 रुपये, तुम्ही देखील या यादीत आहात का?

Big Alert! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार परत घेणार दिलेले 6000 रुपये, तुम्ही देखील या यादीत आहात का?

PM Kisan Scheme: जर अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा झाले असतील तर ते परत घेतले जाणार आहेत. असे न केल्यास FIR दाखल केली जाणार आहे.

PM Kisan Scheme: जर अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा झाले असतील तर ते परत घेतले जाणार आहेत. असे न केल्यास FIR दाखल केली जाणार आहे.

PM Kisan Scheme: जर अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा झाले असतील तर ते परत घेतले जाणार आहेत. असे न केल्यास FIR दाखल केली जाणार आहे.

ओम प्रकाश, नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : देशभरातील विविध ठिकाणी मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये  (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme)घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तमिळनाडू ते उत्तर प्रदेशमधील बाराबंकी आणि मिर्झापूर याठिकाणाहून मोठे घोटाळे समोर आले. दरम्यान ही प्रकरणं समोर आल्यानंतर सरकारने काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी अपात्र असून देखील या योजनेतील पैशांचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील. असे न केल्यास सरकारी पैसे परत मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून संबंधित व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल केली जाईल.

गेल्या महिन्यातच असे समोर आले होते की, यूपीमधील बाराबंकी याठिकाणी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. अडीच लाख अपात्र नागरिकांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. प्रशासनाकडून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतींचा ग्राफ चढताच, इथे वाचा आजचे दर)

-याआधी सप्टेंबरमध्येच गाझीपूरमध्ये असेच प्रकरण समोर आले होते. याठिकाणी 1.5 लाख बनावट शेतकऱ्यांची नावं रद्द करण्यात आली आहेत. व्हेरिफिकेशन करून अपात्र शेतकऱ्यांकडून पैशांची रिकव्हरी करण्याचे काम सुरू आहे. तमिळनाडू राज्यात याप्रकरणी देशातील सर्वात मोठी कारवाई झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याठिकाणी 96 कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 34 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. एकूण 13 जिल्ह्यांमध्ये FIR दाखल केल्यानंतर 52 लोकांना अटक करण्यात आली आहे.

(हे वाचा-SBI अलर्ट! या तारखांना नाही वापरता येणार YONO SBI APP, बँकेने पाठवला मेसेज)

अशातच जर तुम्ही चुकूनही या  योजनेचा लाभ अपात्र असल्यास घेतला असेल, तर ते पैसे परत करणे अत्यावश्यक आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) याआधीच राज्य सरकारांना पत्र लिहून असे कळवले आहे की जर अपात्र नागरिकांना या योजनेतील पैसे मिळाले आहेत तर ते कसे परत घेतले जातील. या लोकांना हे पैसे डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून मिळाले आहेत तर ते डीबीटीच्या माध्यमातूनच परत घेतले जातील.

कसे मिळवता येणार पैसे परत?

सूत्रांच्या माहितीनुसार असे लाभार्थी बँकांकडे त्यांना मिळालेले पैसे परत पाठवण्याच्या व्यवहारासाठी अर्ज करू शकतात. बँकेकडून हे पैसे सरकारकडे परत करण्यात येतील. राज्य सरकारने लाभार्थ्यांना पैसे रिफंड करण्यात मदत करावी असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अपात्रांकडून पैसे परत घेऊन ते https://bharatkosh.gov.in/ याठिकाणी जमा केले जावेत.

First published:
top videos

    Tags: PM Kisan, PM narendra modi