नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी डिमांड वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष फेस्टिवल एडवान्स स्किम (Special Festival Advance Scheme) सुरू केली गेली आहे. या माध्यमातून कर्मचारी 10 हजार रुपये आगाऊ घेऊ शकतात.
कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अर्थमंत्री यांनी विशेष LTC कॅश स्किम योजना जाहीर केली आहे. याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या योजनेत कर्मचार्यांना एलटीएच्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना हे व्हाउचर 31 मार्च 2021 पूर्वी वापरणे बंधनकारक आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडे काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या पाळल्या पाहिजेत.
अर्थमंत्र्यांनी डिमांड वाढवण्यासाठी दोन प्रस्ताव ठेवले आहेत
(1) LTA कॅश व्हाउचर स्कीम (LTC Cash Voucher Scheme)
(2) स्पेशल फेस्टिवल अडवान्स स्कीम (Special Festival Advance Scheme)
➡️स्पेशल फेस्टिवल एडवांस पर ₹4,000 Cr खर्च संभव ➡️31 मार्च 2021 तक इस एडवांस को खर्च करना होगा ➡️फेस्टिवल एडवांस पूरी तरह से ब्याज रहित होगा pic.twitter.com/2WorZ7hRo5
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) October 12, 2020
कोणाला होणार या स्कीमचा फायदा
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचारी या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारचे कर्मचारी या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. त्यासाठी राज्य सरकारला या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागेल.
कसे मिळणार पैसे
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या स्कीमसाठी कर्मचाऱ्यांना रुपे प्री-पेड कार्ड मिळेल. हे कार्ड रिचार्ज करावे लागले. त्यानंतर यात 10 हजार रुपये जमा होती. मुख्य म्हणजे, यासाठी लागणारे बॅंक शुल्क सरकार भरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.