नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : जर तुम्ही निवृत्तीनंतर देखील चांगल्या कमाईच्या शोधात असाल, जर तुम्हाला असे वाटते आहे की वयाच्या साठाव्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला मिळणारा पगार 50000 च्या आसपास असावा आणि एक चांगली रक्कम रोख रकमेच्या स्वरूपात तुम्हाला मिळावी तर तुमच्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension Scheme - NPS) फायद्याची ठरेल. ही नॅशनल पेन्शन स्कीम तुम्ही तुमच्या नावे किंवा तुमच्या पार्टनरच्या नावे सुरू करू शकता. या स्कीममध्ये तुमच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रोख रक्कम आणि मासिक पेन्शन दिली जाते. म्हणजेच साठाव्या वर्षानंतर देखील तुम्हाला कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुमच्याकडे तुमचे असे कमाईचे साधन असेल.
किती करता येईल गुंतवणूक?
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्ही तुमच्या सुविधेनुसार पैसे गुंतवू शकता. तुम्ही यामध्ये 1000 रुपयापासून देखील गुंतवणूक सुरू करू शकता, यामध्ये गुंतवलेली रक्कम तुम्हाला वयाच्या 65 व्या वर्षी मिळेल. जर तुम्ही वयाच्या तिसाव्या वर्षापासून तुमच्या पार्टनर किंवा तुमच्या स्वत:च्या नावे 5000 रुपये महिना यामध्ये गुंतवणूक कराल तर 10 टक्के रिटर्ननुसार तुमच्या खात्यामध्ये वयाच्या 60 व्या वर्षी 1.12 कोटी रुपये जमा होतील. ज्यामध्ये तुम्हाला 45 लाख रुपये कॅश एकरकमी देण्यात येतील. त्याशिवाय आजीवन 45000 रुपये महिना मिळतील. यामध्ये टॅक्स बेनिफिट देखील आहे. इनकम टॅक्स कायदा सेक्शन 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपये या व्यतिरिक्त 50000 रुपयाचे टॅक्स बेनिफिट मिळेल.
एनपीएसमध्ये कोण सामील होऊ शकते
18 ते 60 वयोगटातील कोणताही पगारदार व्यक्ती एनपीएसमध्ये सामील होऊ शकेल. एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती आहेत: Tier-I आणि Tier-II. टियर -I एक सेवानिवृत्ती खाते आहे, जे प्रत्येक सरकारी कर्मचार्यास उघडणे अनिवार्य आहे. तर Tier-II एक स्वयंसेवी खाते आहे, ज्यामध्ये कोणताही पगारदार व्यक्ती त्याच्या वतीने गुंतवणूक सुरू करू शकते आणि कोणत्याही वेळी पैसे काढू शकते