मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अखेर करा तुमचा Dream Job! भारतातील ही कंपनी देतेय 9 तास झोपण्याचे 10 लाख

अखेर करा तुमचा Dream Job! भारतातील ही कंपनी देतेय 9 तास झोपण्याचे 10 लाख

तुम्हाला देखील झोप अतिशय प्रिय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही हे आवडतं काम करत करत लखपती बनू शकता. बंगळुरूतील ही कंपनी लोकांना झोपण्यासाठी 10 लाख रुपये देते

तुम्हाला देखील झोप अतिशय प्रिय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही हे आवडतं काम करत करत लखपती बनू शकता. बंगळुरूतील ही कंपनी लोकांना झोपण्यासाठी 10 लाख रुपये देते

तुम्हाला देखील झोप अतिशय प्रिय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही हे आवडतं काम करत करत लखपती बनू शकता. बंगळुरूतील ही कंपनी लोकांना झोपण्यासाठी 10 लाख रुपये देते

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 03 जुलै: अनेकांच्या तोंडून आपण ऐकतो की, आराम करत पैसे कमावता आलं असतं तर कित्ती बरं झालं असतं. पण हे शक्य होत नाही, पैसे कमावण्यासाठी (Earn Money) खास करून जर तुम्हाला लाखो कमवायचे असतील तर कठोर मेहनत घ्यावी लागते. मात्र आता काहीही न करता पैसे मिळवण्याची आयती संधी तुमच्यापुढे चालून आली आहे. यामध्ये तुम्हाला केवळ एकच गोष्ट करायची आहे की म्हणजे झोपायची (Earn Money by Sleeping for 9 hours). अशाप्रकारे आराम करत तुम्हाला पैसे कमावता येतील आणि ते देखील लाखोंमध्ये.

तुम्हाला देखील झोप अतिशय प्रिय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही हे आवडतं काम करत करत लखपती बनू शकता. बंगळुरूतील ही कंपनी लोकांना झोपण्यासाठी 10 लाख रुपये देते आहे. बंगळुरु स्थित स्लीप अँड हाउस सोल्यूशन कंपनी वेकफिट (Wakefit) दरवर्षी असा एक कार्यक्रम आयोजित करते ज्यामध्ये काही लोकं खास झोपण्यासाठी हायर केले जातात आणि कंपनी त्यांना त्या बदल्यात 10 लाख रुपये देते. कंपनीकडून हा एक स्लीप इंटर्नशीप कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यामध्ये या इटर्न्सना लाखोंची कमाई करण्याची संधी मिळते.

हे वाचा-खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर! याठिकाणी सर्वात कमी व्याजदरानं मिळतंय Home Loan

हजारो उमेदवारांनी केला आहे अर्ज

काही मीडिया अहवालांच्या मते या कंपनीच्या वार्षिक इंटर्नशीप प्रोग्रॅमच्या दुसऱ्या सीझनसाठी आतापर्यंत 60000 पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केला आहे. यामध्ये जिंकणाऱ्याला 10 लाख रुपये देण्यात येतील. तर या इंटर्नशीपसाठी ज्या उमेदवाराची निवड होईल त्याला किंवा तिला 1 लाख रुपये देण्यात येतील. 10 लाखांचं ग्रँड प्राइज जिंकणाऱ्याला इंडियाज स्लीप चँपियनची पदवीही मिळेल.

पूर्ण करावी लागेल ही अट

10 लाख मिळवण्यासाठी तुम्हाला सलग 100 रात्रींसाठी 9 तास गाढ झोप काढायची आहे. प्रत्येक रात्री हे काम करणं हिच या इंटर्नशीपमधील महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दररोज वेळेत येऊन तुम्हाला झोपावं लागेल. झोपण्याऱ्या उमेदवारांना वेकफिटची गादी आणि एक स्लीप ट्रॅकर दिला जाईल. तुमची झोप कंपनी ट्रॅक करेल, झोप गाढ असणं आवश्यक आहे. कंपनीकडून तुम्हाला योग्य सुविधा दिल्या जातील.

हे वाचा-नोकरदारांसाठी Good News! आता काम कमी तर सुट्ट्या जास्त, मोदी सरकार घेणार निर्णय

का सुरू आहे अशी इंटर्नशीप?

वेकफिटचे सहसंस्थापक यांच्या मते, सध्याच्या काळात लोकांचं दैनंदिन आयुष्य बदललं आहे. झोपेची समस्या वाढली आहे. 2020 काळात कोरोना पँडेमिकमुळे तणाव आणि सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होममुळे उशिरा झोपणं, झोप खराब होणं आणि कमी झोप या समस्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शांत झोपेसाठी कंपनीकडून असे कार्यक्रम आखण्यात येत आहे. ज्यामध्ये लोकांच्या झोपण्याच्या पद्धती मॉनिटर केल्या जात आहेत.

First published:

Tags: Banglore, Sleep, Sleep benefits