मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं स्वत:चं घर! याठिकाणी सर्वात कमी व्याजदरानं मिळतंय Home Loan

खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं स्वत:चं घर! याठिकाणी सर्वात कमी व्याजदरानं मिळतंय Home Loan

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीने (LIC Housing Finance Ltd) आपल्या होम लोनच्या (Housing loan) व्याजदरात कपात (Home loan rates) केली असून सध्या दर 6.66 टक्के केला आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीने (LIC Housing Finance Ltd) आपल्या होम लोनच्या (Housing loan) व्याजदरात कपात (Home loan rates) केली असून सध्या दर 6.66 टक्के केला आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीने (LIC Housing Finance Ltd) आपल्या होम लोनच्या (Housing loan) व्याजदरात कपात (Home loan rates) केली असून सध्या दर 6.66 टक्के केला आहे.

नवी दिल्ली, 03 जुलै: प्रत्येकालाच वाटतं की आपल्या स्वप्नातलं स्वत: चं घर असावं. त्यासाठी तो प्रयत्नही करत असतो. या प्रक्रियेत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळणारं कर्ज. गृहकर्ज द्यायला अनेक बँका आणि फायनॅन्शियल इन्स्टिट्युशन्स तयार असतात. पण त्यांचे व्याजदर परवडणारे नसतात. त्यावेळी ग्राहक कमीतकमी व्याज दराने कर्ज कुठे मिळेल याच्या शोधात असतो. तुम्हीही जर घर घ्यायचा विचार करत असाल आणि चांगल्या व्याजदराच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी खूशखबर आणली आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीने (LIC Housing Finance Ltd) आपल्या होम लोनच्या (Housing loan) व्याजदरात कपात (Home loan rates) केली असून सध्या दर 6.66 टक्के केला आहे. 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर हा दर लागू असून हा आतापर्यंतचा सर्वात कमी व्याज दर (All time low interest rate) आहे. पण जर तुम्हाला या व्याज दराने कर्ज हवं असेल तर तुम्हाला खूप तातडीने कामाला लागावं लागेल. तुमची कागदपत्रं तयार करून या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. कारण एलआयसी हाउसिंग फायनान्सची ही योजना फक्त 31 ऑगस्ट 2021 पर्यंतच लागू आहे. त्यातही अट अशी आहे की कर्जाचा पहिला हप्ता 30 सप्टेंबर 2021 च्या आधी भरणं गरजेचं आहे, असं एलआयसी आणि एचएफएलच्या (LIC HFL) वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

हे वाचा-नोकरदारांसाठी Good News! आता काम कमी तर सुट्ट्या जास्त, मोदी सरकार घेणार निर्णय

कंपनीने काय म्हटलं आहे?

कंपनीनी पत्रकात म्हटलं आहे की एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने 30 वर्षांहून अधिका काळासाठीच्या हाउसिंग लोनसाठी आतापर्यंतचे सर्वांत कमी व्याज दर देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्याज दर 6.66 टक्के आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीचे सीईओ (CEO) वाय. विश्वनाथ गौड म्हणाले, 'कोरोना महामारीच्या काळात आम्ही अशाप्रकारे कमी दरांत कर्ज देऊ इच्छित होतो. जेणेकरून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांपैकी अधिकाधिक जणांना स्वत:च घर घेण्याचं स्वप्न साकारता यावं. आम्ही व्याज दर कमी केल्यामुळे ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास वाढेल असं आम्हाला वाटतं.'

हे वाचा-Aadhar मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? कोणती कागदपत्रं आवश्यक

घरबसल्या करा कर्जासाठी अर्ज

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीने होमवाय अप (HomY app) दाखल केलं आहे. ज्याचा वापर करून ग्राहक घरूनच डिजिटल स्वरूपात होम लोनसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर त्यांना ऑनलाइन कर्जाची स्वीकृती मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांना एलआयसी किंवा एचएफएलच्या ऑफिसात न जाता आपल्या कर्जाच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन जाणून घेऊ शकतील. एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी आणि एफएफएल होमवाय अपच्या माध्यमातून घरोघरी असलेल्या ग्राहकांना आपल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. तर तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

First published:

Tags: Home Loan, LIC, Loan