मराठी बातम्या /बातम्या /मनी /

499 रुपयांत स्कूटर... तुम्हाला आलाय का असा मेसेज किंवा कॉल? काय आहे सत्य

499 रुपयांत स्कूटर... तुम्हाला आलाय का असा मेसेज किंवा कॉल? काय आहे सत्य

सावधान! असे कोणतेही फोन किंवा मेसेज आले तर त्याची सत्यता पडताळून पाहा, नाहीतर....

सावधान! असे कोणतेही फोन किंवा मेसेज आले तर त्याची सत्यता पडताळून पाहा, नाहीतर....

सावधान! असे कोणतेही फोन किंवा मेसेज आले तर त्याची सत्यता पडताळून पाहा, नाहीतर....

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे लोक आता इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कारकडे वळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम किंवा ऑफर्स दिल्या जातात.

कधीकधी या ऑफर्सच्या नादात ग्राहकांची फसवणूकही होते. त्यामुळे अलर्ट राहाणं खूप गरजेचं आहे. सध्या 499 रुपयांमध्ये ई स्कूटर मिळत असल्याचे फोन किंवा मेसेज फिरत आहेत. तुम्हाला जर असे फोन किंवा मेसेज आले असतील तर सावधान!

सोशल मीडियातील गुन्हे, बँकिंग फ्रॉड, लॉटरी घोटाळे, गिफ्ट कार्ड फ्रॉड, बनावट सरकारी वेबसाइट फ्रॉड, जॉब फ्रॉड, केवायसी फ्रॉड आणि इतर अनेक घोटाळ्यांना ईमेल याचा वापर करून हॅकर्स ग्राहकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. भारतात ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सरकारकडून अनेक जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत.

हॅकर्स मात्र अजूनही एक पाऊल पुढे आहेत. कोणता ना कोणता नवा मार्ग शोधून ते नागरिकांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन ओला इलेक्ट्रिक स्कूटर घोटाळ्याचा पर्दाफाश केला.

Fake Website : वेबसाईट खरी की फेक, कसं ओळखायचं? तुमच्या मोठ्या फायद्याची छोटीशी ट्रिक

सायबर क्राईम पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.पोलिसांनी गुरूग्राम, बेंगळुरू आणि पाटणासह भारताच्या विविध भागांतून टोळीच्या 20 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

या टोळीने एक हजाराहून अधिक लोकांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यातून आरोपींनी ओला स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे, ग्राहकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

या प्रकरणात, 8 ऑक्टोबर रोजी आयपीसीच्या कलम 420 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी उघडकीस आणली. फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार की नाही. ही बाब अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

5G अपडेट करण्याच्या नादात ही चूक करू नका, पडू शकते महागात

कसा झाला घोटाळा?

CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार हा घोटाळा बेंगळुरूमधील दोन व्यक्तींनी सुरू केला होता. ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करणाऱ्या लोकांची फसवणूक करण्यासाठी या घोटाळेबाजांनी ओला इलेक्ट्रिकची बनावट वेबसाइट तयार केली होती. याप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी पहिला एफआयआर नोंदवण्यात आला अशी माहिती सायबर क्राईम पोलिसांनी दिली.

एका पीडितेने सांगितले की, त्याने स्कूटर बुक करण्यासाठी ओला अॅपचा वापर केला होता, परंतु अॅपवर पैसे भरण्याचा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्याने इंटरनेटवर इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने बनावट वेबसाईटवर आपले नाव आणि मोबाईल नंबर अपलोड केले.

बँक ऑफ महाराष्ट्रने दिलाय महत्त्वाचा अलर्ट, आताच चेक करा नाहीतर होईल नुकसान

या व्यक्तीने त्याचे तपशील शेअर करताच, ते बिहार आणि तेलंगणामधून कार्यरत असलेल्या इतर टोळी सदस्यांनी बाकीच्यांना पाठवले. त्यानंतर पीडित व्यक्तीला फोन आला आणि स्कूटर बुक करण्यासाठी 499 रुपये भरण्याबाबत सांगितलं.

499 रुपयांत बुकिंग मिळतंय असं एक क्षण त्या व्यक्तीला खरंच वाटलं आणि त्याने PayU अॅपद्वारे पेमेंट देखील केले. दुसऱ्या दिवशी, पीडित व्यक्तीला सर्व प्रकारे पेमेंट करण्याचे पर्याय उपलब्ध असल्याचा एक ई मेल मिळाला.

पीडितेने ओला मनी निवडताच त्याला लगेचच व्हॉट्सअॅपवर पेमेंट लिंक मिळाली. या लिंकवर क्लिक करून पीडितेने 30,000 रुपये डाऊन पेमेंट दिलं. हे सगळं खरं वाटावं म्हणून वेबसाइटने 72 हजार रुपये बॅलन्सही दाखवले.

तुम्हाला आलाय का हा SMS? चुकूनही क्लीक करू नका कारण....

घोटाळेबाज एवढ्यावरच थांबले नाहीत आणि त्यांनी पीडितेला स्कूटरच्या डिलिव्हरी चार्जपोटी अतिरिक्त 13 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेला गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या, त्या व्यक्तीने सायबर क्राइम सेलकडे एफआयआर नोंदवण्यासाठी संपर्क साधला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळेबाजांनी 1000 हून अधिक लोकांना आपला बळी बनवले होत. या तक्रारीवर कारवाई करत सायबर क्राइम सेलने पाटणा येथून सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकला, जिथे 60 हून अधिक मोबाईल फोन, 114 सिमकार्ड आणि 7 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी 5 कोटींहून अधिकचे व्यवहार असलेली 25 बँक खातीही शोधून काढली आहेत.

First published:

Tags: Bike, Cyber crime, Delhi Police