मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुम्हाला आलाय का हा SMS? चुकूनही क्लीक करू नका कारण....

तुम्हाला आलाय का हा SMS? चुकूनही क्लीक करू नका कारण....

 तुम्ही जर या मेसेजवर विश्वास ठेवलात तर तुमचं खातं काही सेकंदात रिकामं झालंच म्हणून समजा.

तुम्ही जर या मेसेजवर विश्वास ठेवलात तर तुमचं खातं काही सेकंदात रिकामं झालंच म्हणून समजा.

तुम्ही जर या मेसेजवर विश्वास ठेवलात तर तुमचं खातं काही सेकंदात रिकामं झालंच म्हणून समजा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : तुमच्या स्मार्टफोनमध्ये ऑनलाईन पेमेंट आहे. तुम्ही बिल ऑनलाइन भरता मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्हालाही असे SMS येऊ शकतात. ज्याकडे तुम्ही तातडीनं दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. तुम्ही जर या मेसेजवर विश्वास ठेवलात तर तुमचं खातं काही सेकंदात रिकामं झालंच म्हणून समजा.

तुमच्या मेहनतीचा आणि घामाचा पैसे लुटण्यासाठी सध्या एक टोळी बसली आहे. जी तुम्हाला फ्रॉड मेसेज करून तुमच्या खात्यावरची रक्कम अवघ्या काही सेकंदात गायब करते. तुम्ही या चुका करणं टाळलं तर तुम्हाला त्याचा फटका बसणार नाही.

तुम्हाला आधी एका अनोळखी नंबरवरून मेसेज पाठवला जातो. त्यानंतर तुम्हाला कॉल करुन तुमच्या वीजबिलाचं कनेक्शन कापणार असल्याचं सांगितलं जातं. तुम्हाला ते एक SMS पाठवून त्यांनी दिलेल्या नंबरवर तुमच्या वीजबिलाची चौकशी करायला सांगतात.

तुमच्या घरातील वीज कापली जाणार असल्याचा एक SMS येतो. तुमचं शेवटच्या महिन्यातील बिल अपडेट केलं नसल्याने ही वीज कापली जाणार असल्याचं सांगण्यात येतं. हे टाळायचं असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर फोन करा असंही या SMS मध्ये लिहिण्यात आलं आहे.

तुम्हाला ते कॉल करतात ते तुम्हाला तुमची जुजबी माहिती देतात. त्यानंतर तुमच्याकडून माहिती घेतात आणि ANYDESK डाऊनलोड करायला सांगतात. एक रिमोट अॅप आहे. या अॅपद्वारे तुमचा फोन फसवणूक करणारे तुमचा फोन कंट्रोल करतात.

तुम्हाला समोरचा एक व्यक्ती छोटं ट्रान्झाक्शन करतो आणि ते झालं का हे पाहायला सांगतो. याचवेळी तुमची स्क्रीन रेकॉर्ड केली जाते. तुमच्या नकळत खात्यातून पैसे उकळले जातात. पुढच्या काही क्षणात अख्ख बँक खातं रिकामं होतं.

काय काळजी घ्याल!

आलेल्या अशा sms कडे दुर्लक्ष करा.

चुकून जर तुम्ही गोंधळलात आणि फोन केलात किंवा तुम्हाला असा फोन आला तर तुमची कोणतीही खरी माहिती देऊ नका

तुमचा otp शेअर करू नका

कोणतंही APP किंवा लिंकवर क्लीक करू नका ज्यामुळे तुमचा फोन ट्रॅक केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Cyber crime, Money, SMS