मराठी बातम्या /बातम्या /मनी /5G अपडेट करण्याच्या नादात ही चूक करू नका, पडू शकते महागात

5G अपडेट करण्याच्या नादात ही चूक करू नका, पडू शकते महागात

5G अपडेट करण्यासाठी तुम्हाला आलाय मेसेज? थांब क्लिक कराल तर....

5G अपडेट करण्यासाठी तुम्हाला आलाय मेसेज? थांब क्लिक कराल तर....

5G अपडेट करण्यासाठी तुम्हाला आलाय मेसेज? थांब क्लिक कराल तर....

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : तुम्हाला आलाय का 5G अपडेट करण्यासाठी मेसेज? मग थांबा तुम्ही लगेच तो क्लीक करून अपडेट करू नका. याचं कारण म्हणजे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. बँक ऑफ महाराष्ट्रने याबाबत महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. तुम्हाला 5G अपडेट करण्यासाठी जर कुणी मेसेज किंवा फोन केला तर त्याला कोणतीही माहिती देऊ नका.

1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेची सुरुवात झाली. देशातील 8 ते १० शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अनेक युजर्स आपल्या फोनमध्ये 5G कधी सुरू होईल याच्या प्रतीक्षेत आहेत. याचा फायदा हॅकर्स घेत असून खातं रिकामं करत आहेत.

तुमच्या खात्यावरही हॅकर्सचा डोळा असू शकतो. KYC आणि वीजबिलाचा फंडा आता मागे पडला आहे. 5Gचा नवा फंडा घेऊन हॅकर्स तुमच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्ही खूप सावध राहाणं गरजेचं आहे. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन दिलं आहे.

याबाबत बँकेनं ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही व्यक्तीला तुमचा OTP, बँक खात्याचे डिटेल्स किंवा आधार कार्ड पॅन कार्डची माहिती देऊ नका. चुकूनही थर्ड पार्टी अॅप, एनी डेस्क सारखे अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू नका. त्यामुळे तुमच्या फोनमधून महत्त्वाचा डेटा चोरला जाऊ शकतो.

5G संदर्भात जर तुम्हाला कोणताही अलर्ट, फोन किंवा SMS आला तर तुमची कोणतीही माहिती शेअर करू नका. 5G अपडेट करायचं असेल तर तुम्ही सिमकार्ड कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनच अपडेट करा. कोणत्याही थर्डपार्टी अॅपचा किंवा अशा SMS च्या मदतीने करू नका. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

First published:

Tags: Bank Of Maharashtra, Cyber crime