मुंबई : दिवसेंदिवस ऑनलाइन बँकिंगचं प्रमाण वाढत आहे. कॅशलेसकडे जास्त कल आहे. याचा फायदा सायबर क्राइम करणाऱ्या टोळीनं घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून बँकेचं अकाउंट रिकामं करण्यासाठी योजना तयार केल्या जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने याबाबत एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बँक आहे. अगदी ग्रामीण ते शहरी भागात अनेक ग्राहकांचं या बँकेत अकाउंट आहे. फसवणूक करणाऱ्यांची नजर बँकेतील रकमेवर आहे. त्यामुळे तुम्ही खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र रोज ग्राहकांना अलर्ट देत आहे. ग्राहकांना फ्रॉड करणाऱ्या टोळीच्या जाळ्यात अडकू नये म्हणून काय करायला हवं हे देखील यामध्ये सांगण्यात आलं आहे. बँकेनं सांगितलं आहे की तुम्हाला जर OTP साठी मेसेज आला तर तो कुणालाही देऊ नका.
कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Home Loan, तुमची बँक आहे का?
Don't bow down to fraudsters demands! Scammers are getting smarter day by day to dupe your hard-earned money. So, try not to respond to unknown calls/ messages and keep your banking credentials confidential. Stay Smart! Stay Alert!@RBI @RBISays #RBIKehtaHai pic.twitter.com/nBy2uyZRT5
— Bank of Maharashtra (@mahabank) November 8, 2022
तुमच्या खात्यातून 8 हजार रुपये डेबिट झाले आहेत. जर हे झाले नसतील तर STOP पेमेंट हा पर्याय लिहून तुमचा CVV कोड लिहा आणि तो पुढील क्रमांकावर पाठवा असा एक SMS येत आहे. या SMS कडे दुर्लक्ष करा. कारण असा कोणताही SMS बँकेकडून पाठवण्यात आला नाही. तुम्ही जर तुमचा CVV नंबर शेअर केला तर तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.
महाराष्ट्र बँकेची महाबँक युवा योजना तुम्हाला माहिती आहे का?
या गोष्टी पाळा
- बँक आपल्या खात्यातून वजा झालेल्या रकमेचा SMS करते पण तो कधीच फोन नंबर नसतो. तो सिस्टिम कोड असतो. त्यामुळे त्या SMS वर बँकेचं नाव येतं.
- बँक कधीच तुम्हाला CVV नंबर, OTP किंवा तुमचे वैयक्तीक डिटेल्स मागत नाही, बँकेकडे सगळ्या गोष्टी असतात आणि त्या क्रॉस चेक करण्याची त्यांची एक वेगळी पद्धत असते
- बँक नेहमी महत्त्वाच्या सूचना या नोटिस देऊन किंवा पत्राद्वारे कळवते. त्यामुळे 10 अंकी क्रमांकावर येणाऱ्या अशा फ्रॉड मेसेजकडे दुर्लक्ष करा.
- तुमची माहिती, OTP, CVV, कार्ड नंबर कोणालाही सांगू नका, कोणासोबत शेअर करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.