मुंबई, 15 नोव्हेंबर : फिशिंग, मालवेअर, रॅन्समवेअर आणि स्पायवेअर हल्ल्यांसारखे सायबर गुन्हे हल्ली वाढले आहेत. हल्ली आपण मोठ्या प्रमाणावर पेमेंट्स आणि इतर ऍक्टिव्हिटीसाठी डिजिटल सेवांचा वापर करतो. मात्र याचा वापर करत असताना आपण फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करणे अत्यावश्यक बनले आहे. तुम्ही सरकार आणि पोलिसांच्या सार्वजनिक सेवा घोषणा पाहिल्या असतील ज्यात ते नको असलेली लिंक किंवा ईमेल आल्यास सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात.
सायबर गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी हीच असते की, खरी दिसणारी वेबसाइट बनवायची आणि लोकांनी त्यावर त्यांची वैयक्तिक माहिती टाकल्यावर त्यांना फसवायचे. आता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुमचे मालवेअर आणि व्हायरसपासून संरक्षण करू शकते. असे काही मार्ग आहेत जे तुम्हाला फसव्या वेबसाइटला बळी पडण्यापासून देखील वाचवू शकतात.
अंक शोधा आणि तुमची हुशारी सिद्ध करा, तुम्ही स्वीकारणार का हे चॅलेंज?
डोमेन नाव वाचा : इंटरनेट ब्राउझ करत असताना तुम्हाला काही वेबसाइटवर रिडिरेक्ट केले असल्यास, डोमेन नाव तपासण्यापूर्वी कोणतीही माहिती प्रविष्ट करण्यास कधीही पुढे जाऊ नका. फसवणूक करणारे अनेकदा अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या लोकप्रिय साइट्सच्या पत्त्यासारखे दिसणारे पत्ते बनवतात. परंतु, जर तुम्ही बारकाईने पाहिले तर नावामध्ये नेहमीच थोडासा फरक असतो जो तुम्हाला खरा आणि खोटा यांच्यातील फरक ओळखणे आवश्यक आहे.
सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा : जेव्हा तुम्ही ऑनलाइन खरेदी करता, विशेषत: नवीन साइटवरून, चेक आउट करताना नेहमी सुरक्षित पेमेंट गेटवे निवडा. तुम्ही तुमच्या बँक खात्याची आणि क्रेडिट कार्डची महत्त्वाची माहिती एंटर करत असताना, अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो आणि Paypal, Paytm आणि Razorpay सारखे विश्वसनीय गेटवे वापरण्याचा सल्ला दिला जातो.
अॅड्रेस बार : वेबवर सर्फिंग करताना, पृष्ठाच्या शीर्षस्थानी ‘https://’ असल्याची खात्री करा. येथील ‘S’ दर्शवते की, हे संकेतस्थळ सुरक्षित आहे आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी एनक्रिप्शन वापरते. मात्र तिथे ‘S’ नसल्यास वेबसाइट बनावट आहे, असा होत नाही परंतु तरीही अशा साइटवर तुमचा वैयक्तिक डेटा टाकणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
लॉक मार्क शोधा : तुम्ही वेबसाइटचा पत्ता बारकाईने पाहिल्यास, तुम्हाला एक पॅडलॉक चिन्ह दिसेल. ते चिन्ह तांत्रिकदृष्ट्या दाखवते की साइट TLS/SSL प्रमाणपत्राद्वारे सुरक्षित केली गेली आहे. जास्त खात्री करण्यासाठी, लॉकवर क्लिक करा आणि नंतर ‘कनेक्शन सुरक्षित आहे’ वर क्लिक करा. तुमची माहिती जसे की पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड क्रमांक साइटवर पाठवल्यावर सुरक्षित आहेत हे दर्शवणारा एक मजकूर बॉक्स दिसेल.
अजब योगायोग! 11-11-2011 रोजी 11 वाजून 11 मिनिटांनी जन्म; आता 11 व्या वाढदिवशी...
वेबसाइट प्रमाण पाहा : जर तुम्ही वेबसाइटच्या होमपेजवर आणि लॉगिन पेजवर SSL प्रमाणपत्र तपासाल, तर तुम्हाला कळेल की वेबसाइट बनावट आहे की खरी. यासोबतच वेबसाईटवर अनेक आक्रमक जाहिराती आहेत की नाही हे देखील तपासावे कारण जर तुम्ही वेबसाईट उघडली आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आक्रमक जाहिराती साईटवर दिसल्या तर समजून घ्या की त्या जाहिराती व्हायरसशीही संबंधित असू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Lifestyle