इंदूर, 21 फेब्रुवारी : देव तारी त्याला कोण मारी ही म्हण मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये प्रत्यक्षात आली आहे. इंदूरमध्ये एका भरधाव बाईकनं रस्ता क्रॉस करणाऱ्या चिमुरडीला धडक दिली. या बाईकची धडक बसल्याने ती मुलगी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. तर या अपघानंतर बाईकस्वार फरार झाला. पण सुदैवानं या दुर्घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली नाही.