मुंबई : दिवाळी म्हणजे एक नवीन सुरुवातच असते. देशभरात यंदा दिवाळीचा आनंद आणि उत्साह ओसंडून जात आहे. लक्ष्मीपूजना दिवशी गुंतवणूक करणं शुभं मानलं जातं. हा दिवस शेअर मार्केटसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. लक्ष्मीपूजनादिवशी संध्याकाळी एक तास ट्रेडिंगसाठी शेअर मार्केट सुरू असतं. या दिवशी गुंतवणूक करणाऱ्यांची भरभराट होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. CNBC आवाजने मुहूर्त ट्रेडिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबतचं वृत्त दिलं आहे. यंदा मुहूर्त ट्रेडिंगसाठी संध्याकाळी 06:15 ते 07:15 या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 06:00 ते 06:15 मिनिटांपर्यंत सुरू असेल. एक तासाच्या ट्रेडिंगचा मुहूर्त पाहूनच त्यासाठीची वेळ निश्चित केली जाते. यावेळी व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये व्यापार करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येतो. नफा कमावण्यासाठीच नव्हे, तर गुंतवणूकदारांना या खास प्रसंगी व्यापार करण्याचा वेगळाच उत्साह असतो. नवीन सुरुवात, नवीन व्यवसाय यासह पैशाच्या व्यवहाराशी संबंधित अनेक कामे यावेळी पूर्ण होतात, त्यामुळे पुढील एक वर्ष नफा कायम राहतो. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ चांगला करायचा असेल तर हा शुभ मुहूर्त सोडू नका. तुम्हीही काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. मुहूर्त ट्रेडिंगसाठी फारच कमी वेळ आहे. अशावेळी विचारपूर्वक कमी वेळात गुंतवणूक करणे शहाणपणाचं असतं नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
सणासुदीला Loans ऑफरचा फायदा घ्यावा का? तुमचे खरंच पैसे वाचतात की….आकडेवारी पाहता, गेल्या 15 मुहूर्त ट्रेडिंगपैकी 11 मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान बाजारात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण या दिवशी बाजारात अचानक तीव्र चढ-उतार होत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. आपण चांगल्या गुणवत्तेसह आणि मूलभूत गोष्टी असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. अशावेळी घाईगडबडीत घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. जवळपास सर्व ब्रोकरेज हाऊसेस आणि मार्केट जायंट्स दिवाळीपूर्वी त्यांच्या आवडत्या स्टॉक्सबद्दल अहवाल प्रसिद्ध करतात. हे अहवाल दरवर्षी नवीन संवत आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या आधी प्रसिद्ध केले जातात. यामध्ये मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीच्या सूचना दिल्या आहेत. हा अहवाल आधीच वाचला हवा त्यामुळे 1 तासांच्या व्यापाराच्या दरम्यान योग्य निर्णय घेता येईल. पेनी स्टॉक्स टाळावेत.
क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही करताय का ‘ही’ चूक?दिवाळीनिमित्त सोने खरेदी करणेही शुभ मानले जाते. जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर गोल्ड ईटीएफच्या माध्यमातूनही तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. सोनं खरेदी करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्येही विविधता आणू शकाल. जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल रिस्क कमी घ्यायची असेल तर तुम्ही ब्लू चिप म्युच्युअल फंडांमध्ये मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान गुंतवणूक करू शकता.
मुहूर्त ट्रेडिंग केवळ एका तासासाठी आहे. . कमी वेळात परताव्यासाठी घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेणे टाळा. मीडियम ते लाँग टर्मच्या मुदतीची गुंतवणूक लक्षात ठेवूनच गुंतवणूक करा.