जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सणासुदीला Loans ऑफरचा फायदा घ्यावा का? तुमचे खरंच पैसे वाचतात की....

सणासुदीला Loans ऑफरचा फायदा घ्यावा का? तुमचे खरंच पैसे वाचतात की....

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लोनचे जसे फायदे आहेत तसे याचे काही तोटे देखील आहेत. तुम्हाला जर ते माहिती असतील तर पुढील आर्थिक संकट टाळण्यासाठी त्याची मोठी मदत होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदा बाजारपेठांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. चकमक आणि आनंद उत्साह असं सगळंच एकत्र पाहायला मिळत आहे. हा असा काळ आहे जेव्हा प्रत्येकजण एक नवीन सुरुवात करतो. काही लोक सणासुदीच्या हंगामात वर्षभर सूट आणि ऑफर्सची वाट पाहतात जेणेकरून त्यांना कमी किंमतीत आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करता येतील. याच कारणामुळे ऑनलाइन, ऑफलाइन दुकानांमधून बँकांना अनेक प्रकारची भरघोस सूट दिली जाते. अशावेळी तुम्हालाही काही खरेदी करायची असेल किंवा या सणासुदीच्या हंगामात कर्ज घेण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सध्या ग्राहकांना डिस्काउंट, ऑफर्स, नो कॉस्ट ईएमआय, अॅप बेस्ड लोन, क्रेडिट कार्ड EMI, कॅशबॅक, कार लोन, होम लोन अशा अनेक गोष्टी ऑफर केल्या जातात. पण त्याचा फायदा घेताना त्याची गरज आहे की नाही, हेही पाहायला हवं. CNBC आवाजने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही करताय का ‘ही’ चूक?

1. डिस्काउंट: बँका आणि वित्तीय कंपन्या प्रोसेसिंग फी आणि व्याजदरावर सूट देतात. अशावेळी गृहकर्ज, कार लोन यावर खर्च करण्याचा विचार करत असाल तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. 2. कॅशबॅक - व्यापारी डेबिट आणि क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देतात. सहसा, ऑनलाइन व्यापारी सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देतात. 3 कमी व्यादर : अनेक मोठ्या बँका किंवा एनबीएफसी गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनवर कमी व्याजदर देत आहेत. सणासुदीच्या काळात साधारणतः याला मागणी जास्त असते. या संधीचे भांडवल करण्यासाठी वित्तीय संस्था कमी व्याजदर देतात. 4. प्रोसेसिंग फीवर सूट: बँका किंवा इतर वित्तीय संस्था कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारतात. हे शुल्क एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.25% ते 0.30% पर्यंत आहे. आपण कोणत्या प्रकारचे कर्ज घेत आहात यावर प्रक्रिया शुल्क देखील अवलंबून असतात. काही बँका किंवा क्रेडिट कार्ड प्रदाता फ्लॅट प्रोसेसिंग फी आकारतात.

खुशखबर! ‘या’ देशात भारताच्या ATM मधून पैसे काढता येणार, मिळणार ही सुविधा

जसे हे फायदे आहेत तसे याचे काही तोटे देखील आहेत. तुम्हाला जर ते माहिती असतील तर पुढील आर्थिक संकट टाळण्यासाठी त्याची मोठी मदत होते. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 1. साधारणपणे लोकांना गृह किंवा कार कर्जासाठी दीर्घ नियोजन करणे आवश्यक आहे. अनेक ग्राहक छोट्या खर्चासाठीही पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवरील ऑफर्सचा फायदा घेतात. आर्थिक तज्ज्ञांच्या मते असं करणं टाळावं. अशा खर्चामुळे दरमहा विनाकारण EMI चा बोजा वाढतो. त्यामुळे आपल्या गरजेनुसार खर्च करावा, असा सल्ला दिला जातो. 2. व्यापारी विक्रीपूर्वी किंमती वाढवतात आणि नंतर ग्राहकांना सूट देतात. अशा प्रकारे ग्राहकांना सवलत मिळत असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्ष किमतीत खरेदी करत आहेत. त्यामुळे अशा सवलतींचा ग्राहकांना फायदा होत नाही. 3. काहीजण डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देतात. काही प्रकरणांमध्ये, हा कॅशबॅक खरेदीनंतर 1-6 महिन्यांनंतर मिळेल असं सांगितलं जातं. अशा कॅशबॅकचा फायदा घेण्यासाठी ग्राहक गरजेपेक्षा जास्त खर्च करतात, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. ग्राहक म्हणून असे खर्च टाळावेत. 4. क्रेडिट कार्ड किंवा कर्जाद्वारे कोणतेही उत्पादन खरेदी करणे ही दीर्घकालीन वचनबद्धता आहे. अशावेळी असा खर्च टाळायला हवा. यामुळे येत्या काही महिन्यांचं तुमचं बजेट बिघडू शकतं. त्याचे पैसे देण्यास कधी उशीर झाला, तर त्याचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

पेमेंट संदर्भात आजपासून बदलले हे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

सणासुदीच्या कर्जांमुळे तुमची बचत होते का? तुमची गरज आणि क्षमता ओळखून कर्ज घ्यायचं ठरवलं तर तुमचा मोठा खर्च उचलण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कर्जाआधी तुम्ही आगाऊ हिशोब करणं गरजेचं आहे. आपण किती बचत करण्यास सक्षम आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला अद्याप माहित नसलेले कोणतेही छुपे खर्च द्यावे लागणार नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

कोणतीही ऑफर किंवा डिस्काउंट पाहूनच कर्ज घेऊ नये. सणासुदीच्या काळात कर्ज घेऊन केलेली कोणतीही चूक भविष्यात तुम्हाला भारी पडू शकते. याच कारणामुळे आपल्यावर आणखी आर्थिक भार पडू नये म्हणून तुम्हीही पूर्ण नियोजनासह फेस्टिव्ह लोन घेण्याची शिफारस आर्थिक तज्ज्ञ करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात