जाहिरात
मराठी बातम्या / मनी / क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही करताय का 'ही' चूक?

क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही करताय का 'ही' चूक?

क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही करताय का 'ही' चूक?

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवण्यात काही वाईट नाही पण या चुका तुम्ही करत असाल तर त्या आजपासूनच टाळा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सणासुदीच्या काळात खरेदी वाढते. क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळतात. त्यामुळे बऱ्याचदा क्रेडिट कार्डवर खरेदी करण्याकडे कल असतो. तरुणांमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. पगार कमी असतानाही EMI वर गोष्टी घेण्याचं प्रमाण वाढतं. क्रेडिट कार्डवर खरेदी करण्यास काहीच हरकत नाहीय. पण तुम्हाला त्याबाबत सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे. एकतर कोणतंच क्रेडिट कार्ड हे आयुष्यभर तुम्हाला फ्री मिळत नाही. तुम्हाला काही काळ ते वापरण्यासाठी फ्री दिलं जातं. ज्यामुळे तुम्हाला ते वापरण्याची सवय लागते. त्यानंतर त्यावर अधिक चार्ज आकारला जातो. बँका त्यावर तुम्हाला लिमिट सेट करून देतात. तुम्ही ठरावीक एक रुपयांपर्यंत खर्च केला तर तुम्हाला पुन्हा काही काळासाठी क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी अधिक चार्ज लावले जात नाहीत.

रिटायरमेंट प्लॅनिंग करायला उशीर झालाय? घाबरू नका, फक्त या काही गोष्टी लक्षात ठेवा

हे चक्र असंच चालू राहातं. त्यामुळे तुमची क्षमता नसतानाही तुम्ही खर्च करत राहता आणि तुम्हाला त्यासाठी क्रेडिट कार्डचा आधार मिळतो. क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर बिल पेमेंट करताना तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला हव्यात. त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. या तीन चुका कधीच करू नका पहिली चूक म्हणजे बिल पेमेंट करताना काही गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला तिथे पे नाऊ आणि पे इन EMI असे दोन पर्याय मिळतात. जर तुम्ही EMI वर घेतलं तर तुम्हाला महिन्याला 3 टक्के आणि वर्षाला 36 टक्के व्याजदर भरावं लागणार आहे. याशिवाय जर तुम्ही EMI मध्ये टोटल अमाऊंड ड्यु आणि मिनिमम अमाऊंड ड्यु असे दोन पर्याय असतात. यापैकी तुम्ही मिनिमम पर्याय ठेवला तर नंतर तुमच्यावर जास्तीचा ताण येतो. कारण थोडे उरलेले पैसे हे पुढच्या महिन्यासाठी ठेवले जातात.

News18लोकमत
News18लोकमत

शेवटचे काही महिने बिल भरताना जास्त ओढाताण होते. त्यामुळे टोटल अमाऊंड ड्यु हा पर्याय निवडावा. शक्यतो नो कॉस EMI पर्याय निवडला तर उत्तम. कारण जेवढे महिने जास्त तेवढा त्यावर द्यावा लागणारं व्याजदर जास्त. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर EMI क्लीअर करा. दुसरी चूक म्हणजे क्रेडिट कार्डमधून कधीच चुकूनही पैसे काढू नका. कारण तुम्ही जर असं केलं तर तुमच्या बिलिंग डेटपर्यंत नाही, तर ज्या क्षणी तुम्ही पैसे काढले त्या क्षणापासून तुम्हाला मंथली ३ टक्के व्याजदर सुरू होतं. त्यामुळे अशी चूक करू नका त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

विमा पॉलिसी घ्यायचीये? 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत होणार बदल

तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी म्हणजे बऱ्याचदा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड जवळ ठेवण्याची हौस किंवा मोह असतो. मात्र ही चूक केलीत तर तुम्ही आयुष्यभर पश्चाताप करत राहाल. कारण तुम्ही जेवढे जास्त क्रेडिट कार्ड ठेवाल तेवढं तुम्हाला बिल पेमेंट करताना ओढाताण होईल आणि तुमच्याकडे पैशांची बचत होणार नाही. त्यामुळे फार तर एक किंवा दोनच क्रेडिट कार्ड ठेवा. तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही याकडे सतत लक्ष द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात