• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • चर्चेत असलेल्या 'फ्रेशवर्क्स'नं 500 कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश, कोण आहे कंपनीचा संस्थापक; वाचा सविस्तर

चर्चेत असलेल्या 'फ्रेशवर्क्स'नं 500 कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश, कोण आहे कंपनीचा संस्थापक; वाचा सविस्तर

ही कंपनी नेमकं काय करते, या कंपनीचे संस्थापक कोण, या कंपनीची संकल्पना कशी सुचली, या कंपनीचं मुख्य काम काय आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया...

  • Share this:
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: सध्या फ्रेशवर्क्स कंपनी (Freshworks Company) जोरदार चर्चेत आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. नॅस्डॅक या (Nasdaq) शेअर बाजारातील कंपन्यांच्या यादीत समाविष्ट झालेली ही भारतातील पहिली सॉफ्टवेअर उत्पादक कंपनी (Software Company) आहे. भारतात जसं निफ्टी आहे, तसं नॅस्डॅक हे अमेरिकी शेअर बाजारातील निर्देशांकाचं नाव आहे. बुधवारी ( 22 सप्टेंबर) फ्रेशवर्क्सचा नॅस्डॅकमध्ये धमाकेदार समावेश झाला. त्याची शेअर ऑफरिंग किंमत 36 डॉलरच्या तुलनेत 21 टक्क्यांवर खुली झाली आणि यामुळं गुंतवणूकदारांची चांदी झाली. कंपनीची मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट कॅप 12.2 अब्ज डॉलर झाली. 12.2 अब्ज डॉलर जर रूपयांमध्ये लिहायचं झालं तर 8 ट्रिलियन 99 अब्ज, 13 कोटी 39 लाख रुपये. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील शेअर्स उपलब्ध करून दिले होतो. त्यामुळे कंपनीचे 500 कर्मचारी करोडपती (Crorepati) बनले. विशेष म्हणजे यापैकी काही कर्मचाऱ्यांचं वय 30 वर्षापेक्षा कमी आहे. ही कंपनी नेमकं काय करते, या कंपनीचे संस्थापक कोण, या कंपनीची संकल्पना कशी सुचली, या कंपनीचं मुख्य काम काय आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया... फ्रेशवर्क्स काय काम करते? ही एक सॉफ्टवेअर -अॅज-ए सर्व्हिस कंपनी (Software-as-a - Service) आहे. या कंपनीची स्थापना 2010 मध्ये फ्रेशडेस्कमधून झाली. सुरूवातीला ही कंपनी हेल्प डेस्कप्रमाणं (Help Desk) काम करत होती. त्यानंतर कंपनीनं अनेक तऱ्हेच्या सुविधा दिल्या. फ्रेशवर्क्स अन्य कंपन्यांना एआय (Artificial Intelligence) आधारित कस्टमर सर्व्हिस, सेल्स आणि मार्केटिंग ऑटोमेशन, आयटी, सर्व्हिस मॅनेजमेंट आणि एचआर मॅनेजमेंट सेवा पुरवते.

Job सोबत सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला मिळतील 50 हजार Extra 

 ग्राहकांचं समाधान हेच सर्वोच्च
कोणताही उद्योग, व्यवसाय चालवण्यासाठी ग्राहकांची गरज असते. एकदा जोडला गेलेला ग्राहक कायमस्वरुपी कंपनीसोबत असावा, असं प्रत्येक कंपनीला वाटतं. परंतु, जेव्हा ग्राहकाला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तातडीनं मिळू लागतं, तेव्हाच हे शक्य होतं. मात्र जर ग्राहकाला त्याच्या समस्या सुटण्यासाठी भटकंती करावी लागली तर तो कंपनीपासून दुरावतो. त्यामुळे प्रत्येक कंपनीत असा एक डेस्क असतो, की जो ग्राहकांच्या समस्यांवर उपाययोजना करतो. यालाच कस्टमर सर्व्हिस (Customer Service) असं म्हटलं जातं. फ्रेशवर्क्स ही अन्य कंपन्यांना हेल्प डेस्क किंवा कस्टमर सर्व्हिस उपलब्ध करून देते. फ्रेशवर्क्सनं खास असं काय केलं? असं काम तर सर्वच कंपन्या करतात ना. फ्रेशवर्क्सनं असं काय केलं की ती अन्य कंपन्यांच्या तुलनेत एवढी कंपनी ठरली, असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. दुसऱ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना तक्रारी, समस्या मांडता याव्यात यासाठी एक प्लॅटफॉर्म (Platform) तयार करते. या प्लॅटफॉर्मवर लोक आपल्या तक्रारी दाखल करू शकतात. परंतु, अनेकदा ग्राहकाला त्याच्या समस्या किंवा तक्रारींवर उपाय योजनेकरिता वारंवार ई-मेल, फोन किंवा मेसेजेस करावे लागतात. प्रत्येक वेळी नवा कस्टमर केअर अधिकारी उपलब्ध असल्यानं, वारंवार ग्राहकाला त्याच्या समस्या, तक्रारींविषयी सांगावं लागतं. ही सर्व प्रक्रिया खूप थकवणारी ठरते आणि अखेरीस ग्राहक कंटाळतो. सोशल मीडियावर संबंधित कंपनीकडून आलेले अनुभव शेअर करू लागतो.

LIC Housing देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! कमी व्याजदरात मिळेल 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

 फ्रेशवर्क्सनं कंपनीशी निगडीत अनेक प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी आणले. यामुळे ग्राहकानं ई-मेलव्दारे, फोनव्दारे, मेसेजव्दारे किंवा सोशल मीडियाव्दारे केलेल्या सर्व तक्रारी, समस्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. त्यावर कोणत्या कस्टमर केअर आधिकाऱ्यानं काय कार्यवाही केली, याचाही तपशील उपलब्ध होतो. यामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे, कोणताही तक्रारदार वगळला जात नाही. सर्व तक्रारी, समस्या कंपनीपर्यंत पोहोचतात. दुसरं म्हणजे सर्व तक्रारी, समस्यांचं अत्यंत कमी वेळेत निराकरण होतं. ग्राहकांना नेमकं हेच हवं असल्यानं फ्रेशवर्क्सनं ग्राहकांना त्रासदायक ठरणारी प्रक्रिया बदलून एक सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली.
ही जबरदस्त संकल्पना कशी सुचली? या कंपनीची स्थापना सुमारे दशकभरापूर्वी म्हणजेच 2010 मध्ये झाली. या कंपनीचे गिरीश मातृभूतम (Girish Matrubhutam) आणि शान कृष्णासामी (Shan Krishnasamy ) हे संस्थापक आहेत. या दोघांनी यापूर्वी झोहो कॉर्पमध्ये (Zoho Corp)काम केलं आहे. झोहो कॉर्प ही देशातील सर्वात मोठी SaaS कंपनी आहे. झोहो आणि फ्रेशवर्क्स या इंडस्ट्रीतील दिग्गज कंपन्या मानल्या जातात. या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धक आहेत, असंही म्हणता येईल.

IPL सामन्यादरम्यान Paytm वरून 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी, करावं लागेल हे काम

 गिरीश मातृभूतम यांनी एका मुलाखतीत कंपनीच्या संकल्पनेविषयी नमूद केलं होतं. साधारण 2009 मधील गोष्ट असेल. तेव्हा गिरीश हे ऑस्टन टेक्सासमध्ये कार्यरत होते. त्यानंतर गिरीश अमेरिकेतून चेन्नईत (Chennai) शिफ्ट झाले. यावेळी ते घरातील सर्व साहित्य घेऊन भारतात आले. गिरीश चेन्नईत पोहोचले परंतु, त्यांचं सामान भारतात पोहोचण्यासाठी अडीच महिने लागले. त्यांच्या सामानात एक 40 इंची एलसीडी टीव्हीदेखील होता. परंतु, सामान दाखल होताच, या टीव्हीचं नुकसान झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या टीव्हीचा इन्शुरन्स असल्यानं विमा कंपनीशी संपर्क केल्यास आपल्याला नुकसानभरपाई मिळेल असं त्यांना वाटलं. याबाबत गिरीश यांनी कंपनीला ई-मेल केला. त्यानंतर सर्वप्रकारे कंपनीशी संपर्क केला. यात जवळपास 5 महिने उलटून गेले. परंतु, त्यांची ही समस्या सुटू शकली नाही.
फ्रैशवर्क्स आज जिस ऊंचाई पर है, वहां आज से पहले कोई भारतीय SaaS कंपनी नहीं पहंच पाई.
‘या सर्व प्रकारानं मी वैतागलो. आता हा प्रश्न पैशांचा नव्हे तर बदला घेण्याचा झाला होता,’ असं गिरीश मातृभूतम यांनी सांगितलं. त्यांनी त्याची ही सर्व कथा ऑनलाइन प्लॅटफॉर्म R2I Club वरून शेअर केली. या फोरमवर एका देशातून दुसऱ्या देशात शिफ्ट होणारे लोक आपले अनुभव शेअर करत असतात. गिरीश यांनी आपली समस्या या फोरमवरून शेअर करताच त्याची जोरदार चर्चा होऊ लागली. दुसऱ्याच दिवशी टीव्ही उत्पादक कंपनीचे अध्यक्ष गिरीश यांच्याकडे आले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि गिरीश यांना सर्व पैसे देण्यात आले. यामुळं गिरीश यांच्या डोक्यात एक आयडिया आली. माझ्याप्रमाणेच अनेक ग्राहक दररोज अशा समस्यांमुळं वैतागतात. ग्राहकांचा आवाज पोहचत नाही, ही कंपन्यांची समस्या आहे. जर कंपनीला सर्व ग्राहकांच्या समस्या एकाच जागेवर उपलब्ध झाल्यास त्या त्यावर नक्कीच वेळेवर उपाययोजना करू शकतात, असं गिरीश यांना जाणवलं. यातूनच कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीनं जबरदस्त सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली.

#WeAreAmazon: साजऱ्या करत आहोत Amazon वर विक्री करणाऱ्या लाखो लघु व्यावसायिकांच्या प्रेरक आणि दमदार कथा

 झोहो आणि फ्रेशवर्क्समधील वितुष्ट
झोहोनं ( ज्या कंपनीत गिरीश पूर्वी काम करत होते) फ्रेशवर्क्सवर गंभीर आरोप केले. 2020 मध्ये झोहोनं एक केस दाखल केल्यानंतर या दोन कंपन्यांमधील वितुष्ट अधिकच वाढलं. फ्रेशवर्क्सनं आमच्याकडील गोपनीय माहिती चोरली असून, त्यावर आपला उद्योग व्यवसाय उभारला असल्याचा आरोप झोहोनं केला. तसेच फ्रेशवर्क्सनं आपले कर्मचारी आणि ग्राहकांना बेकायदेशीरपणे आपल्याकडं वळवलं असल्याचा आरोपही जोहोनं केला आहे. फ्रेशवर्क्सनं हे सर्व आरोप नाकारले असून, ही केस अद्याप सुरू आहे.
Published by:Pooja Vichare
First published: