नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: डिजिटल प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm New Offer) सध्या सुरू असलेल्या आयपीएल सिझनच्या (IPL Season) पार्श्वभूमीवर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मोबाईल रिचार्जवर आकर्षक कॅशबॅक (Paytm Cashback Offer) आणि बक्षीसं देण्याची घोषणा केली आहे. दररोज पहिल्या 1 हजार युजर्सना इनिंगमधील ब्रेकदरम्यान आपला मोबाईल फोन क्रमांक रिचार्ज केल्यावर 100 टक्के कॅशबॅक (50 रुपयांपर्यंत) मिळेल. ही ऑफर जिओ (Jio Recharge Offer), व्हीआय (Vi Recharge Offer), एअरटेल (Airtel Recharge Offer), बीएसएनएल (BSNL Recharge Offer) आणि एमटीएनएलच्या (MTNL Recharge Offer) 10 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक सर्व रिचार्जसाठी वैध असेल.
याशिवाय नव्या युजर्सला 11, 21 आणि 51 रुपयांच्या जिओ डेटा पॅक, 16 रुपये आणि 48 रुपयांच्या व्हीआय डेटा पॅक आणि 48 रुपयांच्या एअरटेल डेटा पॅकसाठी 1 जीबी डेटाच्या रिचार्ज रकमे इतका कॅशबॅक मिळेल. ही ऑफर आयपीएल मॅचदरम्यान दररोज संध्याकाळी 7.30 ते 11 वाजेदरम्यान लागू असेल. युजरला प्रत्येक रिचार्जवर निश्चितपणे कॅशबॅक पॉईंट मिळतील. हे पॉईंटस युजर्सला प्रमुख ब्रॅण्डच्या आकर्षक खरेदीसाठी आणि भेटवस्तूंसाठी रिडीम करता येतील.
हे वाचा-Gold Price: पुन्हा उतरला सोन्याचा भाव, रेकॉर्ड स्तरापेक्षा 10799 रुपयांनी स्वस्त
युजर्सना मिळणार या खास सुविधा
युजर्सना अधिक सुविधा मिळाव्यात या हेतूनं पेटीएमनं अलीकडेच 3 क्लिक इन्स्टंट रिचार्ज आणि युजर फ्रेंडली प्लॅन्स डिस्प्लेसारखी फिचर्स आणत मोबाईल बिल अदा करणं अधिक सुलभ बनवलं आहे. पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग आणि पेटीएम पोस्टपेड असे पर्याय देखील युजर्सला उपलब्ध करून दिले आहेत. पेटीएम पोस्टपेडच्या माध्यमातून युजर्स लगेच रिचार्ज करून, नंतर पैसे देऊ शकतात. पेटीएम आपल्या युजर्सला त्यांच्या नव्या बिलाची रक्कम आणि त्याची देय तारीख याबाबत आठवण करून देते. ग्राहक आपल्याशी कायम जोडलेला असावा, असा यामागील हेतू आहे.
हे वाचा-Oyo IPO: आणखी एका आयपीओसाठी राहा तयार! तुम्हाला मिळेल कमाईची सुवर्णसंधी
कंपनीनं काय म्हटलं?
मोबाईल रिचार्ज ही पेटीएमवरील सर्वाधिक लोकप्रिय सेवांपैकी एक आहे. आगामी क्रिकेट सिझनदरम्यान आम्ही आमच्या युजर्सला स्पेशल ट्रिट देत त्यांच्यासह खेळाचा आनंद व्दिगुणित करू इच्छितो. या विशेष भेटीत 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा समावेश आहे. पेटीएम युजर्स वीजबिल, मोबाईल ब्रॉडबॅण्ड आणि डिटूएच रिचार्ज, घरभाडं, क्रेडिट कार्ड बिल भरण्यासह रेल्वे, विमान तिकीट बुकिंग, ई-कॉमर्ससह दैनंदिन गरजांसाठी घरबसल्या आरामात पैसे भरू शकतात. याशिवाय या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्युचअल फंड, शेअर, डिजिटल गोल्ड आणि विमा पॉलिसीच्या प्रिमियमचे पैसे भरू शकतात, अशी माहिती पेटीएमच्या प्रवक्त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers