• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • #WeAreAmazon: साजऱ्या करत आहोत Amazon वर विक्री करणाऱ्या लाखो लघु व्यावसायिकांच्या प्रेरक आणि दमदार कथा

#WeAreAmazon: साजऱ्या करत आहोत Amazon वर विक्री करणाऱ्या लाखो लघु व्यावसायिकांच्या प्रेरक आणि दमदार कथा

#WeAreAmazon स्थिर सहाय्य मिळवून एका भव्य नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी, सतत बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक बाजारात आपली उद्दिष्टे गाठण्यासाठी Amazon India लघुउद्योजकांना सक्षम बनवते.

 • Share this:
  2020-21 हे वर्ष सर्वांसाठी खूपच आव्हानात्मक ठरले आणि लघुउद्योगही याला अपवाद नाहीत. अनेक नवव्यवसाय, विक्रेते आणि पुनर्विक्रेते उद्योग चालू ठेवण्यासाठी आणि संधी मिळवण्यासाठीही धडपडले. पण, Amazon च्या 9 लाखांहून अधिक लघुउद्योग आणि उद्योजकांनी हे सिद्ध केले आहे की प्रयत्न करण्याच्या काळातच प्रेरणादायी आणि लवचिकतेच्या कथा निर्माण होतात. त्रिपुरामधील कारागिरांनी या महामारीच्या अगदी मध्यावर केलेल्या पहिल्या ऑनलाईन विक्रीपासून ते महिला उद्योजकांनी चौकटीबाहेर पडून पौष्टिक ज्युसेस आणि शैक्षणिक खेळणी विकण्यापर्यंत, Amazonच्या एकंदर लघुउद्योजक व विक्रेत्यांच्या नेटवर्कच्या कथा दमदार आणि प्रेरणादायीही आहेत. Amazon शी भागीदारी करणे किती गतीशील असते याविषयी हजारो ग्राहकांना आपल्या गिफ्टिंग स्टोअरद्वारे सेवा पुरवणारे व्यावसायिक ईशान सोनी सांगतात. दिल्लीमधील काही शाखांचे मालक असलेले ईशान आम्हांला सांगतात, "टाळेबंदी उघडल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये, Northland(नॉर्थलँड )ला केवळ 25% प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक बाबींमध्ये समावेश नसलेल्या, लोकांना आत्यंतिक गरज नसलेल्या आमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी ऑफलाईन विक्री हे केवळ एक मोठे आव्हान बनून राहिले होते. म्हणूनच सोनी यांनी Amazon वर आपली ई-कॉमर्सची वाटचाल सुरू केली, जे अल्पावधीतच एक उत्कृष्ट सरप्राईज ठरले. जेव्हा स्टोअरला ऑर्डर्स मिळाला, तेव्हा ते म्हणाले, "हा ऑनलाईन प्रतिसाद अभूतपूर्व होता. आम्हांला पॉन्डीचेरी आणि अंदमान व निकोबार बेटांसारख्या दूरच्या ठिकाणांहून ऑर्डर्स मिळत होत्या. ऑफलाईन स्टोअर हा त्यांचा विक्रीचा प्राथमिक स्त्रोत असला तरीही ऑफलाईनला ऑनलाईन विक्रीची मिळालेली जोड अधिक स्पष्ट व निश्चित यशाकडे घेऊन जाईल. पण या सक्षम ऑफलाईन/ ऑनलाईन संतुलनाद्वारे फायदा मिळवून परत जोर पकडणाऱ्या उद्योजकांमध्ये सोनी हे एकटे नाहीत. इन्व्हर्टर बॅटरीजसारख्या महत्त्वाच्या उत्पादनांची किरकोळ विक्री करणाऱ्या मोहम्मद सिद्दिकी सुरुवातीला ऑनलाईन सुरुवात करण्याविषयी साशंक होते. पण गेल्या दोन वर्षांमधील देशाची स्थिती पाहता, त्यांच्या मेहनतीने केलेल्या बचतीवर त्यांची कशीबशी गुजराण होत होती. "Amazon शी भागीदारी केल्यानंतर, आम्हांला दररोज किमान पाच ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाली, आणि हे महिनाभर चालू असते. अखेर, आम्ही केवळ दुकानातील विक्रीवर अवलंबून नाही आहोत." याचे श्रेय जाते Amazon च्या प्रचंड नेटवर्क आणि विक्रीच्या कल्पक पर्यायांना. त्यांचा व्यवसाय आता हळूहळू वेग घेत आहे, आणि सिद्दिकी आपले ऑफलाईन स्टोअर पुन्हा एकदा चालू करण्यासाठी अखेर सक्षम बनले. पण कमी फायदा असलेल्या आणि एका अतिशय वेगळ्या प्रकारे अत्यावश्यक असलेल्या व्यवसायांचे काय? अश्विनी मालनी यांनी 2014 मध्ये आपली कंपनी सुरू केली. त्यांनी खेळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आणि छोट्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम बनवण्याच्या हेतूने सुरुवात केली. त्यांच्या या उत्पादनांमध्ये काही अशी खेळणी आहेत की ती घेऊन खेळता खेळताच मुले शिकूही शकतील. या अनोख्या संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प होता आणि पूर्णपणे ऑफलाईन विक्रीवर अवलंबून होता. पण संपूर्ण देश या महामारीमुळे खडतर काळातून जात असताना, मालनी सांगतात की त्यांची विक्री "पूर्णपणे ठप्प झाली होती." आणि म्हणूनच ऑनलाईन विक्रीचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांसाठी कामाचा सर्वोत्तम मार्ग ठरला. Amazon च्या मदतीने, STEPS TO DO (स्टेप्स टू डू) पुन्हा सुरू झालेच पण अश्विनी सांगतात की, "इथे परतीचा मार्ग नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. जर आपला एखादा लघुउद्योग असेल किंवा आपण आपल्या घरून एखादा व्यवसाय चालवत असाल, तर Amazon हा तुमच्या बिझनेस प्लॅनचा भाग असलाच पाहिजे. या विक्रेत्यांपैकी प्रत्येकजण असाच अनुभव असलेल्या हजारो अन्य विक्रेत्यांचे प्रतिनिधीत्व करतो आणि ते सर्व Amazon द्वारे विक्रीचा आधार, नेटवर्क आणि मार्केटिंग कौशल्यासाठी भक्कम साथ मिळण्याची इच्छा बाळगतात. भारतातील किरकोळ व्यापारी, कंपन्या आणि सेवा पुरवठादारांनाही आपल्या भव्य कुटुंबात सामील करून लघुउद्योगांसाठी प्रगतीचा राजमार्ग खुला करतो, आणि पुढे वर्षभरात त्यांना पुन्हा एकदा पुढे जाण्याची संधी देतो. येथे क्लिक करून आपणही Amazon success circle मध्ये कसे सहभागी होऊ शकता याविषयी अधिक जाणून घ्या. स्थिर सहाय्य मिळवून एका भव्य नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी, सतत बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक बाजारात आपली उद्दिष्टे गाठण्यासाठी Amazon India लघुउद्योजकांना सक्षम बनवते. या मेहनती लघुउद्योगांचा आदर्श घालून देऊन Amazon ने भारतातील ऑफलाईन दुकानांमुळे येणाऱ्या मर्यादा खोडून काढल्या आहेत आणि एखादे उत्कृष्ट विक्रीचे उत्पादन किंवा सेवा आपल्या चौकटीबाहेर जाऊन विकणे कोणालाही सहजसाध्य केले आहे. आपल्याला आपला व्यवसाय ऑनलाईन करायचा असेल, तर तो कसा सुरू करता येईल ही जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://www.amazon.in/b?node=20172002031&ld=SMINSOApartner&fbclid=IwAR0SrECWx5xGxo_pOriAYstyzGSWOZIphgJokgr98NAsSj75fvefzF5b0xg ही एक भागीदारीची पोस्ट आहे.
  First published: