Home /News /money /

Job सोबत सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला मिळतील 50 हजार Extra 

Job सोबत सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला मिळतील 50 हजार Extra 

तुम्हाला तुमचे आर्थिक उत्पन्न (Income) वाढवण्यासाठी नोकरी (Job) करता करताच एखादा साईड बिझनेस (Business) करायचा असेल तर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : तुम्हाला तुमचे आर्थिक उत्पन्न (Income) वाढवण्यासाठी नोकरी (Job) करता करताच एखादा साईड बिझनेस (Business) करायचा असेल तर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ओला (Ola) या ऑनलाइन वाहन सेवा पुरवणाऱ्या कंपनीबरोबर व्यवसाय करण्याची ही संधी आहे. या व्यवसायाद्वारे तुम्ही दरमहा 40 ते 50 हजार रुपये कमवू शकता. यामध्ये तुम्ही एक सेकंड हँड कार (Second Hand Car) खरेदी करून ती ओला सर्व्हिससाठी देऊ शकता. एकापेक्षा अधिक कार्सही तुम्ही देऊ शकता. जितक्या जास्त कार्स द्याल तितकी कमाई अधिक होईल. तुम्ही ओलासोबत काम सुरू केले की ड्रायव्हरचा पगार आणि अन्य काही खर्च वगळता तुमच्या प्रत्येक कारच्या माध्यमातून होणारी कमाई तुम्हाला मिळेल. यासाठी बाकी सुविधा ओला कंपनी पुरवेल. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून हा ड्रायव्हर पार्टनर्स (Driver Partners) उपक्रम राबवत असून, कंपनीनं आपल्या वेबसाइटवर https://partners.olacabs.com/attach याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : - पॅन कार्ड, रद्द केलेला चेक किंवा पासबुक, आधार कार्ड, घराचा पत्ता - कारची कागदपत्रे – आरसी बुक, वाहन परवाना, कार विमा - ड्रायव्हरची कागदपत्रे - ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घराचा पत्ता Oyo IPO: आणखी एका आयपीओसाठी राहा तयार! तुम्हाला मिळेल कमाईची सुवर्णसंधी ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळच्या ओलाच्या कार्यालयात जावे लागेल. तिथं तुम्हाला ओला सर्व्हिससाठी कार द्यायची असल्याचे कळवावे लागेल. त्यानंतर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास 8 ते 10 दिवस लागू शकतात. त्यानंतर तुमच्या कार्स ओलासाठी काम करू लागतील. ओलाकडून त्यांना बुकिंग्ज मिळायला सुरुवात होईल. तुमच्या कार्ससाठी ड्रायव्हर शोधणे आणि त्यांना पगार देणे ही जबाबदारी कार मालकाची म्हणजे तुमची असेल. कंपनी त्यांना थेट पैसे देणार नाही, मात्र ड्रायव्हर्सना आवश्यक प्रशिक्षण कंपनी देईल. कंपनीच्या एका अॅपद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व कार आणि ड्रायव्हर्सचा मागोवा घेता येईल. प्रत्येक कारचे बुकिंग (Booking) आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईची (Income) माहितीही मिळेल. महिन्याच्या शेवटी महिन्याचे उत्पन्न तुमच्या बँक खात्यात जमा होईल. 'या' कंपनीतील 500 कर्मचारी झाले कोट्यधीश, कसं ते जाणून घ्या उत्पन्न असे मिळेल : पीक अवर्स दरम्यान बुकिंग होत असेल तर त्यावर 200 रुपयांपर्यंत बोनस (Bonus) मिळतो. एका दिवसात 12 राईड्स (Rides) पूर्ण केल्या, तर कंपनीकडून 800 ते 850 रुपये बोनस मिळेल. 7 राईड्स पूर्ण केल्यावर किमान 600 रुपये अतिरिक्त बोनस आहे. विमानतळावरील ड्रॉपवरदेखील बोनस मिळतो. तसंच अन्य काही बोनसही असतात. कंपनीतर्फे देण्यात येणारे कमिशन (Commission) आणि बोनस वेळोवेळी बदलतात. याची नोंद घेणं आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी बोनससह सर्व उत्पन्न तुमच्या बँक खात्यात (Bank Account) जमा होते.
    First published:

    Tags: Business, Money, Small business

    पुढील बातम्या