• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • LIC Housing देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! कमी व्याजदरात मिळेल 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

LIC Housing देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! कमी व्याजदरात मिळेल 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

एलआयसी हाउसिंग फाइनेंस (LIC Housing Finance) ने अशी घोषणा केली आहे की 700 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर (CIBIL Score) असणाऱ्या ग्राहकांना स्वस्त व्याजदराने होम लोन (Home Loan Rates) देण्यात येईल

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. छोटसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान घर घेण्यापूर्वी अनेकांसाठी पहिली पायरी असते ती म्हणजे होम लोन घेणं. आता गृहकर्ज कुठून घ्यावं असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर देशातील एक नामांकित कंपनी ही संधी देत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी लाइफ इन्शोरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी (LIC Housing Finance) तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी देत आहे. कंपनीने गुरुवारी जाहीर केले की सणासुदीच्या काळात (LIC Festive Season Offer) ग्राहकांना सर्वात कमी व्याज दराने अर्थात 6.66 टक्के दराने गृहकर्ज दिले जाईल. कोणताही ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतो. जुलै 2021 मध्ये कंपनीने घोषणा केली होती की नवीन ग्राहक 6.66 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतात. कंपनीने आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवली आहे. हे वाचा-Gold Price: पुन्हा उतरला सोन्याचा भाव, रेकॉर्ड स्तरापेक्षा 10799 रुपयांनी स्वस्त कोणत्या ग्राहकांना मिळेल कर्ज? एलआयसी हाउसिंगने अशी माहिती दिली आहे की, या योजनेअंतर्गत 700 किंवा त्यापेक्षा सिबिल स्‍कोर (what is CIBIL Score) असणाऱ्या ग्राहकांना स्वस्त व्याजदराने होम लोन मिळेल. या सुविधेचा फायदा पगारदार वर्ग (Salaried), प्रोफेशनल्स आणि स्वयं रोजगारातून कमाई करणारे घेऊ शकतात. 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान मंजूर केल्या जाणाऱ्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व गृहकर्जांवर 6.66 टक्के दराने व्याज आकारले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. 31 डिसेंबर 2021 पूर्वी ग्राहकांना पहिला हप्ता (First Disbursement) मिळेल. कर्जाची रक्कम वाढवल्याने काय होणार फायदा? एलआयसी हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. विश्वनाथ गौर म्हणाले की, यापूर्वी 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.66 टक्के व्याज आकारले जात होते. आता कर्जाची रक्कम चार पटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांना स्वस्त दरात गृहकर्ज देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. तसेच, यामुळे ग्राहक स्वतःसाठी एका मोठ्या आणि चांगल्या घराची खरेदी करू शकतात. हे वाचा-Oyo IPO: आणखी एका आयपीओसाठी राहा तयार! तुम्हाला मिळेल कमाईची सुवर्णसंधी प्रोसेसिंग फीमध्ये मिळणार सूट? LIC Housing Finance प्रोसेसिंग फीमध्ये कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के सूट देखील जाहीर केली आहे. मात्र, या अंतर्गत ग्राहकांना जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासह, पेन्शन बेनिफिट योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना 6 ईएमआयमधून सूट मिळणार आहे. ग्राहक सहजपणे गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात आणि कंपनीच्या अॅप HomY द्वारे मान्यता मिळवू शकतात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: