• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 'या' राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्वात महाग; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे की केजरीवाल कुणाचा पगार आहे जास्त?

'या' राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्वात महाग; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे की केजरीवाल कुणाचा पगार आहे जास्त?

राजकारण्यांचा (Salary of Political Leaders) पगार जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. खासकरून प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे? कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना (CM Salary) जास्त तर कमी पगार कुणाला मिळतो? जाणून घ्या सविस्तर

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: ज्यांच्यावर देशातील नागरिकांची धुरा आहे, त्या नेत्यांना पगार किती मिळत असेल? असा सवाल एकदा तरी प्रत्येकाच्या मनात येतो. अनेकांना राजकारणात रस नसतो मात्र हा प्रश्न त्यांना नक्कीच पडतो. या राजकारण्यांचा (Salary of Political Leaders) पगार जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. खासकरून प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे? कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना (CM Salary) जास्त तर कमी पगार कुणाला मिळतो? असे सवालही तरुणांचा मनात असतात. याबाबत गुगल सर्च करून जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला जातो. दरम्यान मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे. 2022 मध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly elections 2022) होणार आहेत. अशा परिस्थितीत, निवडणुकीच्या वेळी, लोकांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे? जाणून घ्या की तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती आहे. तसंच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार वेगवेगळा असते. मुख्यमंत्र्यांचा पगार दर दहा वर्षांनी वाढवला जातो. वाचा-कंगाल पाकिस्‍तानला मोठा झटका! IMF आणि इम्रान खान सरकारमधील 'ही' चर्चा फिस्कटली सर्वसाधारणपणे लोकांचा असा विश्वास आहे की राष्ट्रपतींचा पगार सर्वाधिक असेल, त्यानंतर पंतप्रधानांचा पगार असेल. पण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, अशी काही राज्ये आहेत जिथे मुख्यमंत्र्यांचा पगार पंतप्रधानांच्या पगारापेक्षा जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार भारतात सर्वाधिक आहे. यानंतर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पगार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM Salary) आहेत. दरम्यान त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा पगार सर्वात कमी आहे. कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा किती आहे पगार? राज्य-सीएमचा मासिक पगार तेलंगणा-4,10,000 रुपये दिल्ली -3,90,000 रुपये उत्तर प्रदेश- 3,65,000 रुपये महाराष्ट्र- 3,40,000 रुपये आंध्र प्रदेश- 3,35,000 रुपये वाचा-आजही वाढले इंधनाचे दर, ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका गुजरात- 3,21,000 रुपये हिमाचल प्रदेश- 310,000 रुपये हरयाणा-2,88,000 रुपये झारखंड-  2,55,000 रुपये मध्यप्रदेश-  2,30,000 रुपये छत्तीसगड-2,30,000 रुपये पंजाब- 2,30,000 रुपये गोवा-2,20,000 रुपये बिहार- 2,15,000 रुपये पश्चिम बंगाल- 2,10,000 रुपये तमिळनाडू- 2,05,000 रुपये कर्नाटक- 2,00,000 रुपये सिक्किम- 1,90,000 रुपये केरळ- 1,85,000 रुपये राजस्थान- 1,75,000 रुपये वाचा-Radhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स! तज्ज्ञांनाही बसला धक्का उत्तराखंड- 1,75,000 रुपये ओडिशा- 1,60,000 रुपये मेघालय-1,50,000 रुपये अरुणाचल प्रदेश- 1,33,000 रुपये आसाम- 1,25,000 रुपये मणिपूर- 1,20,000 रुपये नागालँड- 1,10,000 रुपये त्रिपुरा- 1,05,500 रुपये
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: