• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कंगाल पाकिस्‍तानला मोठा झटका! IMF च्या या निर्णयामुळे इम्रान खान सरकारला चीनसमोर पसरावे लागणार हात?

कंगाल पाकिस्‍तानला मोठा झटका! IMF च्या या निर्णयामुळे इम्रान खान सरकारला चीनसमोर पसरावे लागणार हात?

पाकिस्तानमधील आर्थिक संकट (Economic Crisis in Pakistan) संपण्याचं नाव नाही घेत आहे. कारण आता पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: पाकिस्तानमधील आर्थिक संकट (Economic Crisis in Pakistan)  संपण्याचं नाव नाही घेत आहे. कारण आता पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. रविवारी एका पाकिस्तानी प्रसारमाध्यमाच्या अहवालात अशी माहिती समोर आली आहे की, पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांच्यातील एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या हप्त्यासाठी झालेल्या चर्चेची ताजी फेरी अनिर्णीत आहे. आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज नाकारले आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, इम्रान खान सरकारने IMF चे मन वळवण्यासाठी वीज आणि पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price in Pakistan) किंमतीत प्रचंड वाढ केली, पण हे जागतिक संस्थेचे समाधान करू शकले नाही. IMF कडून कर्ज न मिळाल्यामुळे आता पाकिस्तानला पुन्हा एकदा चीन किंवा आखाती देशांसमोर आपली हात पसरावे लागणार आहेत. पाकिस्तान आणि IMF ने जुलै 2019 मध्ये 6 अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी करार केला होता. जानेवारी 2020 मध्ये या करारास ब्रेक लागला होता. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाला जूनमध्ये ब्रेक लागला. जून ते ऑगस्ट दरम्यान या कर्ज कराराबाबत दोन्ही बाजूंनी कोणतीही गंभीर चर्चा (IMF and Pakistan Government Issue) झालेली नाही. वाचा-धक्कादायक! कोरोनामुळे 6 लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला आयएमएफसोबत झालेल्या कराराअंतर्गत पाकिस्तानला पुढील हप्ता म्हणून एक अब्ज डॉलर्स दिले जाणार होते. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, या कर्जासंदर्भात पाकिस्तान सरकार आणि आयएमएफ यांच्यातील चर्चा फिस्कटली आहे. पाकिस्तानचे अर्थ सचिव आयएमएफला कर्जासाठी राजी करण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमध्ये बराच काळ तळ ठोकून आहेत. अहवालानुसार, ते पुढील काही दिवस त्याठिकाणीच राहू शकतात, जेणेकरून कर्जासाठी पाकिस्तानला मंजूरी मिळेल. वाचा-अमित शाहांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, आळवले शांततेचे सूर परदेशी कर्ज न घेण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले इम्रान खान सरकार आजतागायंत सतत कर्ज घेत आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तान सरकारने कबूल केले होते की आता प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीवर सुमारे एक लाख 75 हजार रुपयांचे कर्ज आहे. आयएमएफला खुश करण्यासाठी, इम्रान सरकारने बेसलाइन टॅरिफसाठी वीज दर सरासरी 1.39 रुपये प्रति युनिट वाढवले ​​आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मात्र हा सर्व खटाटोप फोल ठरल्याचं चित्र आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: