मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Radhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स! तज्ज्ञांनाही बसला धक्का

Radhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स! तज्ज्ञांनाही बसला धक्का

राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत.

राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत.

राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत.

    नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत. ब्लू डार्ट एक कुरिअर वितरण सेवा देणारी कंपनी आहे. ब्लू डार्टने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशा स्थितीत ब्लू डार्टमधील हिस्सा कमी करण्याच्या दमानीच्या निर्णयामुळे बाजारातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. दमानी जून 2020 तिमाहीपासून कमी करतायंत ब्लू डार्टमधील शेअर्स जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत राधाकिशन दमानी यांनी ब्लू डार्टचे 50,000 शेअर्स विकले. दमानी यांचा कंपनीतील हिस्सा 1.68 टक्के होता, तो आता 1.47 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे मार्केट एक्सपर्ट देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ब्लू डार्टच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सप्टेंबर तिमाहीपर्यंत राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या कंपनी ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ब्लू डार्टमध्ये गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी, ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंट्सकडे ब्लू डार्टमध्ये 3,48,770 शेअर्स किंवा 1.47% हिस्सा होता.  त्याआधी एप्रिल-जून तिमाहीत ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्सने ब्लू डार्टमध्ये 3,98,770 शेअर्स किंवा 1.68% शेअर्स ठेवले होते. यानुसार राधाकिशन दमानी यांनी दुसऱ्या तिमाहीत ब्लू डार्टचे 50,000 शेअर्स विकले आहेत. वाचा-या Multibagger Stock ने दिला 22000 टक्के परतावा, तुमच्याकडे आहे का हा शेअर? दरम्यान राधाकिशन दमानी जून 2020 पासून ब्लू डार्टमधील आपला हिस्सा कमी करत आहेत. जून 2020 च्या तिमाहीत त्यांनी शेअर्स 3.35% वरून 3.11%  कमी केले आहेत. त्यानंतर, त्यांनी ही भागीदारी सप्टेंबर 2020 तिमाही, डिसेंबर 2020 तिमाही, मार्च 2021 आणि जून 2021 तिमाहीत अनुक्रमे 2.26%, 1.97%, 1.96%आणि 1.68% केली होती. आता पुन्हा यातील भागीदारी दमानी यांनी कमी केली आहे. चांगला रिटर्न देऊनही दमानी यांनी कमी केली भागीदारी राधाकिशन दमानी यांनी ब्लू डार्टमधील भागीदारी कमी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण या शेअरने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ब्लू डॉर्टचे शेअर्स गेल्या एका वर्षात 3,101.10 रुपयांवरून 6,525 रुपयांवर पोहोचले आहेत आणि या कालावधीत सुमारे 110% परतावा दिला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या