मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: आजही वाढले इंधनाचे दर, ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका; इतके वाढले दर

Petrol-Diesel Price Today: आजही वाढले इंधनाचे दर, ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका; इतके वाढले दर

Petrol Diesel Price on Record High: आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

Petrol Diesel Price on Record High: आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

Petrol Diesel Price on Record High: आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 17 ऑक्टोबर: पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) दिवसेंदिवस वाढत आहेत. आज, रविवार, 17 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price on 17th October) किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर (Petrol-Diesel Rate on Record High) पोहोचले आहेत. IOCL ने जारी केलेल्या दरानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 111.77 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर 102.52 रुपये  आहेत. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 4.15 रुपयांनी वाढले आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.15 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल 4.70 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 90 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर सतत लक्ष ठेवून आहे. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत. Credit Card चा वापर सांभाळून करा, फायदा सोडाच डोक्याला हात लावायची वेळ येईल! चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर >> दिल्ली पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 94.57 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 111.77 रुपये आणि डिझेल 102.52 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 103.01 रुपये आणि डिझेल 98.92 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 97.68  रुपये प्रति लीटर या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. आता 'या' वेबसाईटवर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कमवा भरघोस पैसे; कमाईची संधी अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
First published:

Tags: Petro price hike, Petrol, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price, Petrol price hike

पुढील बातम्या