मराठी बातम्या /बातम्या /मनी /Budget 2023: ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना मोठा धक्का! बजेटमध्ये करण्यात आली 'ही' घोषणा

Budget 2023: ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना मोठा धक्का! बजेटमध्ये करण्यात आली 'ही' घोषणा

ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना मोठा फटका

ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना मोठा फटका

भारत सरकारने सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ऑनलाइन गेमिंगच्या मनी प्राइजवर टीडीएसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. ऑनलाइन गेमिंगमधून पैसे जिंकणाऱ्यांना आता प्रत्येक रकमेवर टीडीएस भरावा लागेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये त्यांनी ऑनलाइन गेमिंगसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. मात्र यामुळे गेम खेळणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. आता ऑनलाइन गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसच्या नियमाबाबतही मोठा बदल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षांपासून भारतात ऑनलाइन गेमिंगची क्रेझ खूप वाढलीये. सध्या ऑनलाइन गेमिंगमधून पैसे जिंकणाऱ्या व्यक्तीला 10000 हजारांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के TDS भरावा लागतो, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले आहे की, 1 एप्रिल 2023 पासून ऑनलाइन गेमिंगमध्ये जिंकलेली कितीही रकमेवर आता टॅक्स म्हणजेच TDS भरावा लागणार आहे.

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी सरकारकडे टीडीएस कमी करण्याची मागणी केली होती. सध्या ऑनलाइन गेममध्ये जर कोणी 10,000 पेक्षा कमी जिंकले तर त्याला TDS भरावा लागत नाही, मात्र नवीन नियमानुसार आता 10,000 पेक्षा कमी पैसे जिंकले तरी देखील TDS भरणे बंधनकारक असणार आहे.

व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या पार्टनरला द्या 'हे' डिजिटल गिफ्ट! 

ऑनलाइन गेमिंगच्या प्राइज मनीवर TDS चा नियम काय?

सध्या जर एखाद्या व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगमध्ये 1000 हजार रुपये खर्च केले आणि 35000 जिंकले, तर TDS कापल्यानंतर विजेत्याला केवळ 24500 रुपये मिळतील आणि त्याला 10500 रुपये कर भरावा लागेल. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगमधून 9500 रुपये जिंकले तर त्याला कोणत्याही प्रकारचा टीडीएस भरावा लागत नाही, परंतु नवीन नियमानंतर आता सर्वांना कर भरावा लागेल.

Budget 2023 : Aadhaar-PAN Card संदर्भात मोठ्या घोषणा! अवश्य घ्या जाणून 

गेमिंग कंपन्यांची काय मागणी होती?

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी बजेटमध्ये टीडीएसची टक्केवारी कमी करण्याची मागणी केली होती. ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांना टीडीएस कपातीत सूट देण्याची आणि गेम डेव्हलपमेंट फंडाची स्थापना करण्याची मागणी अर्थसंकल्पाकडून करण्यात आली होती. ऑनलाइन गेमिंग क्षेत्र हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.

2023 मध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे, पुढील पिढीमध्ये ऑनलाइन गेमिंगची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. 2022 मध्ये 15 अब्ज डाउनलोडसह भारत हा जगातील सर्वात मोठा मोबाईल गेम वापरणारा देश बनणार आहे.

First published:

Tags: Budget 2023, Online, Tax, Union Budget 2023