मराठी बातम्या /बातम्या /मनी /व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या पार्टनरला द्या 'हे' डिजिटल गिफ्ट!

व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या पार्टनरला द्या 'हे' डिजिटल गिफ्ट!

व्हॅलेंटाइन डे गिफ्ट आयडियाज

व्हॅलेंटाइन डे गिफ्ट आयडियाज

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कुणाला संपूर्ण दिवस आपल्या जोडीदारासोबत घालवायचा असतो, फिरायची इच्छा असते. यासोबतच खास गिफ्ट देण्याचा विचार देखील तरुण करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रेमवीरांसाठी खास असणारा 'व्हॅलेंटाइन डे' जवळ येत आहे. व्हॅलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये मोठी उत्सुकता असते. हा दिवस कधी येईल याची वाट बहुतेक तरुण पाहत असतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसमोर आजच्या दिवशी प्रेम व्यक्त केले जाते. हा दिवस खास बनवण्यासाठी अनेक प्लानिंग केले जातात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कुणाला संपूर्ण दिवस आपल्या जोडीदारासोबत घालवायचा असतो, फिरायची इच्छा असते. यासोबतच खास गिफ्ट देण्याचा विचार देखील तरुण करतात. पण काय द्याव असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी खास डिजिटल गिफ्ट तुम्ही देऊ शकता. ते कोणते याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड

व्हॅलेंटाइन डेला तुम्ही तुमच्या पार्टनरला म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची भेट देखील देऊ शकता. म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सुरक्षित साधन आहे आणि याद्वारे शेअर बाजारातील वाढीचा फायदा घेता येतो. यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही तुमची गरज पूर्ण करू शकता.

'व्हॅलेंटाइन डे'साठी IRCTC ची जबरदस्त ऑफर! कमी पैशात करा बँकॉक दौरा 

गिफ्ट कार्ड

तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट कार्ड देखील देऊ शकता. आता बहुतेक शोरूम्स आणि ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्समध्ये गिफ्ट कार्ड उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अमाउंट पर्याय खूप जास्त आहे, 500 द्यायचे की 5 हजार, ते तुम्ही स्वतः ठरवू शकता.

फिरायला जायचा प्लान करताय? IRCTC चा काश्मीर प्लान अवश्य पाहा, मिळतील 'या' सुविधा!

दागिने किंवा इतर सोने

तुम्ही तुमच्या पार्टनरला सोन्याचे दागिने किंवा गोल्ड बार, कॉइन इत्यादी भेट देऊ शकता. महिलांनाही सोने आवडते. तसेच हे असे गुंतवणुकीचे साधन आहे जे आर्थिक संकटातही खूप उपयुक्त आहे. सोन्याचे नाणे एक ग्रॅमपासून सुरू होते.

पेपर गोल्ड

तुम्ही तुमच्या पार्टनरला फिजिकल सोन्याऐवजी डिजिटल किंवा पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करून भेट देऊ शकता. उदाहरणार्थ गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड इ. या सर्वांमध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे आणि तुम्हाला सोने सुरक्षित ठेवण्याची काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला सोन्याचे दर वाढण्याचा फायदा मिळत राहतो आणि ते विकणेही सोपे जाते.

स्मार्ट वॉच

तुम्ही तुमच्या क्रशला व्हॅलेंटाईन गिफ्टमध्ये स्टायलिश स्मार्ट वॉच देऊ शकता. हे स्मार्ट वॉच तुमच्या क्रश किंवा पार्टनरच्या आरोग्याचीही काळजी घेईल.

First published:

Tags: Valentine Day