Home /News /money /

Budget 2022: Income Taxpayers या अर्थसंकल्पातून काय मिळाले? वाचा काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा

Budget 2022: Income Taxpayers या अर्थसंकल्पातून काय मिळाले? वाचा काय आहेत बजेटमधील मोठ्या घोषणा

Budget 2022 LIVE: करदात्यांना दिलासा देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आता करदाते त्यांच्या चुका सुधारू शकतात आणि 2 वर्षांच्या आत असेसमेंट इयरसाठी अपडेटेड रिटर्न दाखल करू शकतात.

    नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) लोकसभेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. करदात्यांचे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष आहे. करदात्यांना यावर्षीच्या बजेटमध्ये काय दिलासा मिळणार याबाबत गेले अनेक महिने चर्चा सुरू होत्या. दरम्यान करदात्यांना या बजेटमधून हवा तसा दिलासा मिळालेला नाही. कारण इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, करदाते त्यांचे वार्षिक रिटर्न दोन वर्षांसाठी अपडेट करू शकतील आणि काही चूक असल्यास बदल करू शकतील. याद्वारे करदात्यांना त्यांचा थकित करही भरू शकतात. यासाठी सरकार लवकरच नवीन आयटी रिटर्न पोर्टल (New IT Return Portal) जारी करणार आहे. सहकारी समित्यांसाठी देखील कर 15 टक्क्यांवरुन कमी करत 12 टक्के करण्यात आले आहे. यावरील सरचार्ज कमी करत 7.5 टक्के करण्यात आला आहे. शिवाय अपंग व्यक्तींच्या पालकांना विम्यावर मिळणारी लंपसम टॅक्स कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅन्युटीचा देखील समावेश करण्यात आला आहे. हा लाभ 60 वर्षांच्या वयापर्यंत लागू होईल. हे वाचा-Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर... अर्थसंकल्पातील ठळक घोषणा >> 60 लाख नोकऱ्या दिल्या जातील. >> पुढील 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे चालवल्या जातील. >>  3 वर्षात 100 PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. >> 1.5 लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर शक्य होणार आहे. >> 2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधली जातील. >> देशात डिजिटल विद्यापीठ तयार केले जाईल. >> 20,000 कोटी रुपये खर्चून 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील. >> देशातील 5 मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीनेही काम केले जाईल. हे वाचा-Budget 2022 : RBI डिजिटल रुपी लॉन्च करणार, क्रिप्टोवरही टॅक्स भरावा लागणार >> 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. >> 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल. >> शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची (Center of Excellence) स्थापना केली जाईल. >> एक राष्ट्र, एक नोंदणी योजना (One Nation, One Registration) सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल. >> इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Budget, Nirmala Sitharaman, Union budget

    पुढील बातम्या