Home /News /money /

Budget 2022 : RBI डिजिटल रुपी लॉन्च करणार, क्रिप्टोवरही टॅक्स भरावा लागणार

Budget 2022 : RBI डिजिटल रुपी लॉन्च करणार, क्रिप्टोवरही टॅक्स भरावा लागणार

Budget 2022: डिजिटल चलनाच्या ट्रान्सफरवर 30 टक्के दराने कर आकारला जाईल असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. हे देखील आधीच अपेक्षित होते.

    नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : डिजिटल करन्सीबाबत (Digital Currency) असलेला सस्पेन्स केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी संपवला आहे. यावर्षी देशात डिजिटल रुपया (Digital Rupee) जारी केला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने डिजिटल रुपया आणण्यासाठी सर्व तयारी केली आहे. आता नियंत्रित डिजिटल चलन आणण्याची तयारी करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक बिटकॉईनसारख्या (Bitcoin) डिजिटल चलनाला पर्याय देणार आहे. याच्या मदतीने डिजिटल चलनात सध्याचा धोका कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच डिजिटल रुपया धोकादायक गुंतवणुकीऐवजी सुरक्षित गुंतवणुकीचा नवा पर्याय देईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सुरू करणार आहे. डिजिटल करन्सीवर 30 टक्के कर डिजिटल चलनाच्या उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जाईल असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. हे देखील आधीच अपेक्षित होते. सरकारने कर दर जाहीर करून क्रिप्टो करन्सीसारख्या डिजिटल चलनाबाबतचे कर चित्र स्पष्ट केले आहे. Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर... अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्राबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये, डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणा डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आली आहे. यासोबतच 'वन क्लास, वन टीव्ही चॅनल' योजनेअंतर्गत 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शिक्षणात सुधारणा करण्याच्या आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक भाषांमधील 200 टीव्ही चॅनेलद्वारे इयत्ता 1 ते 12 वीच्या मुलांपर्यंत पोहोचवले जाईल. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होते. Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा, घर बांधण्याचा खर्च कमी होणार, काय आहे कारण? पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार देशभरात रेल्वेचा जाळं आणि मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway) सुरु होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. वन स्टेशन वन प्रोडक्ट (One Station One Product) योजना आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा >> 60 लाख नोकऱ्या दिल्या जातील. >> पुढील 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे चालवल्या जातील. >> 3 वर्षात 100 PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. >> 1.5 लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर शक्य होणार आहे. >> 2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधली जातील. >> देशात डिजिटल विद्यापीठ तयार केले जाईल. >> 20,000 कोटी रुपये खर्चून 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील. >> देशातील 5 मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीनेही काम केले जाईल. >> 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. >> 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल. >> शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची (Center of Excellence) स्थापना केली जाईल. >> एक राष्ट्र, एक नोंदणी योजना (One Nation, One Registration) सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल. >> इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Cryptocurrency, Nirmala Sitharaman, Rbi, Union budget

    पुढील बातम्या