Home /News /money /

Budget 2022 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सध्याचा टॅक्स स्लॅबनुसार किती टॅक्स भरावा लागतो? चेक करा डिटेल्स

Budget 2022 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सध्याचा टॅक्स स्लॅबनुसार किती टॅक्स भरावा लागतो? चेक करा डिटेल्स

वैयक्तिक करदात्यांच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे 60 वर्षांखालील लोक, दुसरे ज्येष्ठ नागरिक 60 ते 80 वर्षे आणि तिसरे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 16 जानेवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance minister Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करतील. यावेळीही आपल्या मिळकतीवर किती कर लावला जाणार याकडे देशभरातील नागरिकाचं लक्ष राहणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Coronavurs) आयकर स्लॅबमध्ये (Tax Slab) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र अर्थ मंत्रालयाने 2020 च्या अर्थसंकल्पात वेतन वर्गासाठी आयकराचे दोन पर्याय दिले होते. हे पर्याय आर्थिक वर्ष 2020-21 पासून प्रभावी आहेत. या दोन पर्यायांपैकी, एक पर्याय जुना/विद्यमान कर स्लॅब आणि दुसरा पर्याय म्हणजे नवीन कर स्लॅब, जो बजेट 2020 मध्ये सादर करण्यात आला होता. सध्याच्या नियमांनुसार देशभरात एकच स्लॅब प्रणाली कार्यरत आहे. जिथे वेगवेगळ्या स्लॅबसाठी वेगवेगळे कर दर निर्धारित केले आहेत. वैयक्तिक करदात्यांच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. एक म्हणजे 60 वर्षांखालील लोक, दुसरे ज्येष्ठ नागरिक 60 ते 80 वर्षे आणि तिसरे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. Budget 2022: अर्थसंकल्पात येणाऱ्या या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितेय का? सोप्या भाषेत घ्या समजून सध्याच्या व्यवस्थेत आयकराचे 7 स्लॅब करण्यात आले आहेत. यानुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही. 2.5 लाख ते 5 लाख वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के दराने कर भरावा लागेल. त्याच वेळी, 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के दराने कर भरावा लागेल. तर 7.5 लाख ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के दराने कर आकारला जातो. 10 लाख ते 12.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के दराने कर भरावा लागतो. 12.5 लाख ते 15 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जातो. या नवीन नियमांमध्ये लागू केलेल्या कर स्लॅबमधील दर कमी आहेत, परंतु कलम 80C अंतर्गत उपलब्ध असलेल्या इतर कर सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. LIC Jeevan Pragati Scheme : दरमाह 6000 वाचवा आणि 28 लाख मिळवा जुनी प्रणाली काय आहे? ज्यामध्ये, जुन्या आयकर प्रणालीनुसार, 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर आकारला जात नाही. दुसरीकडे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असल्यास 5 टक्के कर आकारला जातो. तथापि, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर, आयकर कायदा 87A अंतर्गत 12,500 रुपयांची सूट मिळू शकते. यासोबतच 5 लाख ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के दराने कर आकारला जातो. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 20 टक्के कर आकारला जातो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Tax, Union budget

    पुढील बातम्या