इनकम टॅक्समधला दिलासा सरसकट नाही; नवीन टॅक्स स्लॅबसाठी सोडाव्या लागणार 70 सवलती

इनकम टॅक्समधला दिलासा सरसकट नाही; नवीन टॅक्स स्लॅबसाठी सोडाव्या लागणार 70 सवलती

5 लाख ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घसघशीत फायदा होणार अशा बातम्या येत असतानाच, ही कररचना सरसकट नाही हे स्पष्ट होत आहे. Income tax ची नवी स्लॅब स्वीकारण्यासाठी तुम्हाला इतर 70 सवलतींवर पाणी सोडायला लागेल.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पात कररचनेचे स्लॅब बदलणार (Income Tax Slab Changes )असल्याची मोठी घोषणा करण्यात आली, खरी पण त्यात एक मेख आहे. आता 5 लाख ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घसघशीत फायदा होणार अशा बातम्या येत असतानाच, ही कररचना सरळ नाही हे स्पष्ट होत आहे. इनकम टॅक्सची नवी स्लॅब स्वीकारायची की जुन्या रचनेप्रमाणेच कर भरायचा याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यावरच सोडला आहे. आपण कुठल्या रचनेप्रमाणे कर द्यायचा याचा पर्याय कर देणाऱ्याने निवडायचा आहे. कारण नव्या स्लॅबमध्ये कुठलीही सूट किंवा डिडक्शन घेता येणार नाही. नवीन स्लॅब घेतल्या तर 70 सवलती मिळणार नाहीत. त्या नेमक्या कोणत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या 70 करसवलींवर पाणी सोडलं तरच नवीन टॅक्स स्लॅब लागू होईल. या सवलती घ्यायच्या असतील तर जुन्याच टॅक्स स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल.

कुठलंही exemptions किंवा deductions शिवाय नवीन टॅक्स स्लॅब स्वीकारायचा की उत्पन्नाच्या रकमेत सूट घेऊन जुन्याच टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा याचा विचार वैयक्तिक करदात्याला आता करावा लागणार आहे.

नव्या रचनेप्रमाणे 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे.

अशा असतील इनकम टॅक्सच्या नव्या स्लॅब

5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

- 5 लाख ते 7.5 लाख उत्पन्न - 10 टक्के इनकम टॅक्स

- 5 लाख ते 10 लाख रु. उत्पन्न - 15 टक्के इनकम टॅक्स

- 10 ते 12.5 लाख रु. उत्पन्न - 20 टक्के इनकम टॅक्स

- 12.5 ते 15 लाख रु. उत्पन्न - 25 टक्के इनकम टॅक्स

हे आहेत जुने आणि नवे टॅक्सचे दर

आता हे नवे टॅक्स दर लागू होत असताना पूर्वी मिळत असलेल्या करसवलतींचा फायदा घेता येणार नाही. या सवलती न घेता कमी दराने कर देता येईल. पण सवलती हव्या असतील तर जुनाच म्हणजे जास्तीचा कर लागू होईल. त्यामुळे उत्पन्न कराची बदललेली रचना सरसकट म्हणता येणार नाही. आता आपलं उत्पन्न किती, इतर फायदे किती आणि त्यावर जुन्या दराने टॅक्स भरायचा की सवलतींचा फायदा न घेता नवा - कमी केलेला दर घ्यायचा हे सामान्य करदात्याने ठरवायचे आहे.

अन्य बातम्या

Budget 2020 : आधार कार्ड असेल तर लगेचच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

Union Budget 2020: इनकम टॅक्सचे नवे 5 स्लॅब, तुम्हाला किती कर भरावा लागणार?

Budget 2020: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 16 कलमी कार्यक्रम

निर्मला सीतारमन यांनी बजेटचं भाषण पूर्ण वाचलं नाही, ‘हे’ आहे कारण

Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

 

 

First published: February 1, 2020, 2:44 PM IST

ताज्या बातम्या