Budget 2020 : निर्मला सीतारमन यांनी बजेटचं भाषण पूर्ण वाचलं नाही, ‘हे’ आहे कारण

Budget 2020 : निर्मला सीतारमन यांनी बजेटचं भाषण पूर्ण वाचलं नाही, ‘हे’ आहे कारण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नववर्षातला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जानेवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नववर्षातला पहिला अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांनी अर्थसंकल्पाचे भाषण कमी केले. त्याचबरोबर त्यांच्या नावावर सर्वात मोठे भाषण सादर करण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे.

निर्मला सीतारामन शनिवारी 2020-21चे बजेट सादर करताना 2 तास 40 मिनिटे भाषण केले. याआधी 2019मध्ये त्यांनीच 2 तास 14 मिनिटांत बजेट संपवले होते. यात तिसऱ्या क्रमांकावर जसवंत सिंह यांचे नाव आहे. त्यातबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह सीतारमन या सलग दुसऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.

वाचा-Budget 2020 : आधार कार्ड असेल तर लगेचच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

बजेटमधल्या महत्त्वाच्या घोषणा

लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे. तर, 5 लाख रु.ते 7.5 लाख उत्पन्न - 10 टक्के इनकम टॅक्स, 7.5 लाख ते 10 लाख रु. उत्पन्न - 15 टक्के इनकम टॅक्स, 10 ते 12.5 लाख रु. उत्पन्न - 20 टक्के इनकम टॅक्स, 12.5 ते 15 लाख रु. उत्पन्न - 25 टक्के इनकम टॅक्स.

वाचा-Union Budget 2020: इनकम टॅक्सचे नवे 5 स्लॅब, जाणून घ्या तुम्हाला किती कर भरावा लागणार

शेतकऱ्यांसाठी मेगा प्लॅन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर भर दिला आहे. (Provisions for Farmers in Indian Budget 2020). त्यांनी शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर केला.आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं त्या म्हणाल्या. शेती व्यवसायाला स्पर्धात्मक बनवत शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चित केलं जाईल. कृषी आणि संलग्न उपक्रम, सिंचन, ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21 वर्षासाठी 2.83 लाख कोटी रुपयांचं वाटप करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

वाचा-Budget 2020 : PMC बँक घोटाळ्यानंतर खातेदारांना दिलासा, 5 लाखांच्या ठेवी सुरक्षित

आधार कार्ड असेल तर लगेचच मिळणार पॅन कार्ड

तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ही घोषणा केली आहे. मोदी सरकारने 11 नोव्हेंबरपर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 जणांनी पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक केलं आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यातच आता या नव्या योजनेमुळे पॅन कार्ड मिळवणं आणखी सोपं होणार आहे.

First published: February 1, 2020, 2:18 PM IST

ताज्या बातम्या