नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ही घोषणा केली आहे. मोदी सरकारने 11 नोव्हेंबरपर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 जणांनी पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक केलं आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यातच आता या नव्या योजनेमुळे पॅन कार्ड मिळवणं आणखी सोपं होणार आहे. काय आहे उद्देश? पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा उद्देश हा बनावट पॅन कार्डला आळा घालण्याचा आहे. यामुळे मल्टीपल पॅन कार्ड बनणं बंद होईल. तुम्हाला जर इनकम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतील तर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी आयटीआर फाइल करताना तुम्ही ही कार्ड लिंक केली असतील. याबद्दलची माहिती जर आयकर विभागाकडे असेल तर ती आपोआप अपडेट होईल.
Finance Minister Nirmala Sitharaman: Govt to further ease process of allotment of PAN. Govt to launch system for instant allotment of PAN on basis of Aadhaar pic.twitter.com/WbDsLvTueU
— ANI (@ANI) February 1, 2020
हे काम करायचं असेल तर तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या ई फायलिंग वेबसाइटवर जाऊन हे चेक करू शकता. www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर ही माहिती मिळू शकेल. इथे तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही लिंक करू शकता.
#WATCH Live: FM Nirmala Sitharaman presents Union Budget 2020-21 (source: LS TV) https://t.co/5D2tasLNgN
— ANI (@ANI) February 1, 2020
===================================================================================